Gondia News: खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रांवर विक्री केलेल्या धानाची चुकार रक्कम तब्बल तीन महिन्यांपासून रखडली होती. या हजारो शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून शासनाने दहा जिल्ह्यांसाठी एकूण ९९२ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील मोठा हिस्सा गोंदिया जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे..खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत शासकीय धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर धानाची खरेदी करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या खरेदी प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यात सुमारे ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून लाखो क्विंटल धान खरेदी झाले. मात्र, खरेदीनंतर चुकारे रक्कम वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांवर सावकार व बँकांच्या कर्जाचा ताण वाढत गेला..Farmers Relief: अतिरिक्त भूसंपादन कारवाई तत्परतेने व्हावी.दरम्यान, शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला चुकाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे ३०९ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून शेतकऱ्यांच्या खात्यात हळूहळू रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. .Farmers Relief: अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टिबाधित गावांतील ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी.अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याने समाधान व्यक्त होत असले, तरी अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. अर्ध्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी उर्वरित शेतकऱ्यांना पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार आहे..कायमस्वरुपी यंत्रणेची मागणीनिधी टप्प्याटप्प्याने वितरित होत असल्याने चुकाऱ्यांची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे वेळेवर चुकारे देण्याची मागणी केली असून,भविष्यात अशा विलंबामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू नये यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.