Rural Fraud: सालेकसा तालुक्यातील कोटरा येथील पुजारिटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत तब्बल १ कोटी १७ लाख १७ हजार ७२० रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थेचे पदाधिकारी व संबंधितांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले असून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..या प्रकरणी फिर्यादी राजेश केशवराव शहारे (वय ५२) यांनी सालेकसा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केला. मत्स्यपालनासाठी व नायलॉन जाळे खरेदीसाठी मंजूर निधीचा अपहार केल्याचे समोर आले आहे..Fish Farming: मत्स्य व्यवसाय विकासासाठी योजना प्रभावीपणे राबवा.तपासात बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी काढल्याचे तसेच मजुरीच्या नावाखाली दाखविण्यात आलेल्या खर्चाचे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. ७० लाख ६१ हजार ७७० रुपये मजुरी खर्च दाखविण्यात आला असला तरी त्यासंदर्भातील खात्रीशीर नोंदी आढळल्या नाहीत. याशिवाय ३४ हजार, २३ हजार ९५० रुपयांच्या व्यवहारांबाबत कोणतीही नोंद किंवा साक्ष उपलब्ध नसल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी.Seed Fraud Case: बियाण्यांत फसवणूक झाल्याने शेतकरी कृषी अधीक्षक कार्यालयात.दाखविण्यात आलेल्या १२ लाख २७ हजार रुपयांमध्येही अनियमितता आढळून आली. या प्रकरणी आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यानुसार सालेकसा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६(५), ३१६(२), ३१६(३), ३१६(४), ३४०, ६०(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या घोटाळ्यात आणखी बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रकरणी संस्थेचे पदाधिकारी व संबंधितांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले असून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..कोटरा मत्स्यपालन घोटाळा (गोंदिया)एकूण अपहार : १,१७,१७,७२० रुपयेगुन्हा दाखल : ११ जणांवरकालावधी : एप्रिल २०२४ – मार्च २०२५मजुरी खर्च दाखवला : ७०,६१,७७० रुपये (पुरावे अपुरे)संशयित व्यवहार : ३४,२३,९५० रुपये (नोंदी अनुपस्थित)मानधन खर्च : १२,२७,००० रुपये (अनियमितता)गुन्हे कलम : भारतीय न्यायसंहिता ३१६(५), ३१६(२), ३१६(३), ३१६(४), ३४०, ६०(A).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.