Gold Silver Price Today Bullion Market Update: रोज नवा उच्चांक गाठणाऱ्या सोने- चांदी दरात शुक्रवारी (दि. ३०) घसरण झाली. सोने एका दिवसात तोळ्यामागे ६,८६५ रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीचा दर २२,८२५ रुपयांनी कमी झाला. २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर प्रति १० ग्रॅम १ लाख ७३ हजार ५२९ रुपयांवर आला. तर चांदीचा जीएसटीसह दर प्रतिकिलो ३ लाख ६७ हजार ८७७ रुपयांपर्यंत खाली आला आहे..चांदीचा दरात आज घसरण झाली असली तरी ती महिनभरात १ लाख २६ हजार रुपयांनी महागली आहे. तर सोन्याच्या दरात सुमारे ३५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. .इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीविना दर प्रति १० ग्रॅम १ लाख ६८ हजार ४७५ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर जीएसटीविना प्रतिकिलो ३ लाख ५७ हजार १६३ रुपयांवर खुला झाला..Gold Silver Prices: खरेदीदारांना घाम फुटला; चांदी ४ लाख पार, सोने पावणेदोन लाखांवर .गुरुवारी चांदीचा जीएसटीविना दर प्रति किलो ३ लाख ७९ हजार ९८८ रुपयांवर बंद झाला होता. तर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १ लाख ७५ हजार ३४० रुपयांवर स्थिरावला होता. आजा त्यात घसरण दिसून आली. यामुळे लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. .आज २२ कॅरेटचा दर ६,२८८ रुपयांनी कमी होऊन १ लाख ५४ हजार ३२३ रुपयांपर्यंत खाली आला. जीएसटीसह हा दर १ लाख ५८ हजार ९०० रुपयांवर जातो. आज १८ कॅरेटचा दर १ लाख २६ हजार ३५६ रुपयांवर खुला झाला. गुरुवारच्या तुलनेत आज त्यात ५,१४९ रुपयांनी घसरण झाली. १८ कॅरेटचा आजचा दर जीएसटीसह १ लाख ३० हजार रुपये होतो. १४ कॅरेट सोनेही ४ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. .Gold Ring : सोन्याची अंगठी कोणी घालू नये?.शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोने आणि चांदीच्या वायदा बाजारात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे सोने-चांदीचे दर घसरले असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.