Kolhapur News : ‘गोकुळ’ स्वतःच्या ब्रॅण्डचे आइस्क्रीम आणि गोकुळ बटर बाजारात आणणार असल्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष (गोकुळ) नविद मुश्रीफ यांनी केली. दूध संघाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. गोकुळ लवकरच वीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठणार आहे. दूध संकलनाचे पुढील उद्दिष्ट २५ लाख लिटर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली..सभेत संघाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती..Gokul Dudh Sangh: गोकुळ दूध संघ आता आईस्क्रीम, चीज बाजारात आणणार, सभेत घोषणा, बैठकीत नेमकं काय ठरलं?.श्री. मुश्रीफ म्हणाले, की गोकुळ दूध संघाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे. मार्च २०२४ अखेर संघाची एकूण उलाढाल ३,६७० कोटी रुपये होती, जी मार्च २०२५ अखेर तब्बल ३,९६६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, एका वर्षात २९६ कोटींची वाढ नोंदवली गेली. तसेच संघाचे भागभांडवल ७७ कोटी ९८ लाख झाले असून, यात १ कोटी ७४ लाखांची वाढ झाली आहे..Gokul Milk Rate : ‘‘गोकुळ’तर्फे म्हैस, गाय दूध खरेदी दरात एक रुपया वाढ’.शेतकऱ्यांची मागणी आणि जिल्ह्यातील नेत्यांच्या सूचनेनुसार, आजपासून म्हैस दूध वाससाठी प्रति लिटर १२ रुपये आणि गाय दूध वाससाठी प्रति लिटर ८ रुपये इतका अतिरिक्त दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, म्हैस दुधाला प्रति लिटर सरासरी २.४५ रुपये, तर गाय दुधाला प्रति लिटर सरासरी १.४५ रुपये इतका दर फरक मिळणार आहे..संघाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना २० पैसे जादा दर फरक मिळणार असून, तो अंतिम हिशेबात समाविष्ट केला जाणार आहे. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी अहवाल वाचन केले. या वेळी सर्व संचालकांसह हजारो सभासद उपस्थित होते. या वेळी २१ वरून २५ संचालक करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.