Agricultural Crisis: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील शेतकरी रामचंद्र आप्पाशा कळके (वय ५०) यांनी ‘गोकुळ शुगर’ने उसाचे बिल थकवल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषप्राशन केल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता. २१) रात्री शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) मृत्यू झाला. .या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २२) सिव्हिल रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. अखेर थकीत ऊसबिल व आर्थिक मदत तत्काळ देण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर नातेवाइकांनी माघार घेतली..धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल न मिळाल्यानेच कळके यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वी रुग्णालय परिसरात ३०० ते ४०० शेतकरी जमा झाले होते. ‘‘जोपर्यंत कारखानदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’’ अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली..Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या.यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे आणि प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाशी आणि नातेवाइकांशी सविस्तर चर्चा केली. या वेळी बाधित शेतकरी कळके यांचे थकीत असलेले दीड लाख रुपयांचे उसाचे बिल आणि त्यांच्या कुटुंबाला सर्व शासकीय लाभ मिळवून देण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले..Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि.दरम्यान, धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे जवळपास ६० कोटी रुपये थकीत आहेत. या न्याय्य हक्काच्या बिलासाठी शेतकऱ्यांनी तब्बल १७ दिवस तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात मृत शेतकरी रामचंद्र कळके हे देखील सक्रिय सहभागी होते, अशी माहिती आता देण्यात आली आहे..जीव गेल्यानंतर आली उपरतीदरम्यान, कळके यांच्या या आत्महत्येनंतर आणि प्रशासनाच्या रेट्यानंतर कारखाना प्रशासनाला उपरती आली आणि त्यांनी रात्री उशिरा कळके यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले. तसेच त्यांचे थकलेले ऊस बिलही दिले. पण कारखाना प्रशासनाने वेळीच हे पैसे दिले असते, तर कळके यांचा जीव गेला नसता, कारखान्याच्या या भूमिकेवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.