Gokul Dairy Election Political Battle: राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) रविवारी (ता. १८) मतदान होत आहे. या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडीक या महायुतीच्या नेत्यांसह काँग्रेस समविचारी आघाडीचे आमदार सतेज पाटील व भाजपची पक्ष म्हणूनही प्रतिष्ठा पणास लागली आहे..‘गोकुळ’च्या २५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी ५४१८ संस्था सभासद पात्र आहेत. सकाळी आठपासून जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर मतदान होत आहे..Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघाच्या रणांगणात दुरंगी लढत.सर्वाधिक पाच केंद्रे करवीर तालुक्यात असून, गगनबावडा व हातकणंगले तालुक्यात केवळ प्रत्येकी एकच केंद्र आहे. गेली सहा महिने निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे..Gokul Milk Union Election: राज्याच्या आखाड्यात ‘गोकुळ’ची लढाई .संस्था पात्र, अपात्र करण्यापासून ‘गोकुळ’च्या कारभाराच्या चौकशीपर्यंत वाद उफाळून आला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. महायुती विरुद्ध काँग्रेस समविचारी आघाडी अशी सरळ लढत होत आहे..गेली पंधरा दिवस गाठीभेटी, संपर्क सभांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शुक्रवारी प्रचाराची सांगता झाली. रविवारी सकाळी आठपासून मतदान होत आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.