Gokul Dairy Kolhapur Politics: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) अध्यक्ष निवडीवरुन महायुतीत राजकीय हालचाली वेगाने सुरु आहेत. याचदरम्यान आज सकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर बोलताना मुश्रीफ यांनी महत्त्वाचा खुलासा केला. गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सतेज पाटील (Satej Patil) यांनी फॉर्म्युला द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. .''एक विशिष्ट परिस्थिती गोकुळमध्ये तयार झालेली आहे. काँग्रेसचे १३ संचालक निवडून आले. महायुतीचे १२ संचालक आहेत. अध्यक्ष निवडीच्या सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी १४ संख्याबळ हवे. त्यांना कोरम पूर्ण करण्यासाठी १ संचालक कमी पडत आहे. तर आम्हाला २ संचालक कमी पडतात,'' असे मुश्रीफ यांनी सांगितले..Gokul Milk Union: ‘गोकुळा’तील ‘आनंदी आनंद’.निवडणूक नियमानुसार तीन बैठकीत कोरम पूर्ण झाला नाही तर प्रशासक नेमला जातो. प्रशासक नेमला की निवडणूक होईल. आमच्या गटाला विरोधी पक्षाचा कौल मिळाला. यामुळे ते त्यांच्या अध्यक्ष निवडीसाठी का जातील? कोरम १४ चा असल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला. आता २५ लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी आणि सत्तेचा पेच संपवण्यासाठी शासनाने निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले..Gokul Milk Union: लोकशाही वाचविण्यासाठी शासन नियुक्त संचालक : मंत्री हसन मुश्रीफ.यासाठी सतेज पाटील यांनी फॉर्म्युला द्यावा. पण त्यांनी निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री, तीन मंत्री आणि दहा आमदारांना दोन हाताला बांधून काय काय पोस्टर लावले? मुख्यमंत्र्यांची त्यांनी बदनामी केली. हे योग्य नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. विशेषतः माझ्या मुलाबद्दल जातीयवादी प्रचार केला, ही गोष्ट माझ्या जिव्हारी लागली. यामुळे आता २५ लोक एकत्र बसून कारभार करतील. सतेज पाटील यांना अपेक्षित असा कारभार होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत..'गोकुळ'मध्ये कुणाचाही मागच्या दाराने प्रवेश होणार नाही. तज्ज्ञ माणसंच निवडली जातील. माझा मुलगा तज्ज्ञ संचालक होणार नाही. जे या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील; त्यांचीच नेमणक शासन करेल. कोणत्याही राजकीय पक्षाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचीच नियुक्ती सरकार करेल, असा विश्वास त्यांनी याआधी बोलताना व्यक्त केला होता..'ऊसदरावर सन्मानजनक तोडगा'ऊसदरावर तोडगा निघाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ऊसदरावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवली होती. तीन- चार तास बैठक घेऊन एकरकमी पहिली उचल ३,९०० रुपये, हंगाम संपताना १०० रुपये आणि साखरेची वर्षभर प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांच्यावर विक्री झाली तर २०० रुपये आणि त्याहून अधिक साखरेला दर मिळाला तर ७०-३० फॉर्म्युला ठरवला जाईल, असा तोडगा निघाला. त्याबद्दल राजू शेट्टी यांचे आभार. ऊसदरावर सन्मानजनक तोडगा निघाला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.