Kolhapur Politics: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) अध्यक्ष निवडीआधी राजकीय हालचाली सुरुच आहेत. २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक आहे. पण काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे केवळ १३ संचालक असल्याने महायुती काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. .दरम्यान, गोकुळच्या अध्यक्ष निवडीवेळी महायुती सहकार्य करेल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत महायुतीतील नेत्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा, आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क साधून सकारात्मकता ठेवून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. .Gokul President Election: गोकुळ अध्यक्ष निवडीत कोरमचा पेच; राजकीय हालचालींना वेग, निवडून आलेले संचालक सहलीवर.आमचे १३ उमेदवार निवडून आलेले आहे. कोरमचा मुद्दा न करता आपण गोकुळ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील- चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करावे. याबाबत आम्ही आधीच ठरवले होते. ते स्वप्न पूर्ण आता होत आहे. यामुळे सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती केली असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. .Gokul New Chairman: 'गोकुळ'चा नवा अध्यक्ष ठरला! शशिकांत पाटील-चुयेकरांचे नाव निश्चित; सतेज पाटील काय म्हणाले?.तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती पुढे आली आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले असले तरी अध्यक्ष निवडीच्या सभेला १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. यावरुन पेच निर्माण झाला आहे. .या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करुन सहकार्याची भूमिका घेण्याची विनंती केली आहे. यावर आता महायुती काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.