Irrigation Corporation Restructuring: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची अनेकांकडे असलेली थकबाकी, आकृतिबंधानुसार पुनर्रचना तसेच उत्पन्नाचे स्रोत बळकट करून महामंडळ स्वायत्त करणे हे विषय आपल्या अजेंड्यावर असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली..येथील सिंचन भवनमध्ये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक बुधवारी (ता. ८) पार पडली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती..मंत्री विखे पाटील म्हणाले, कग फ्लोटिंग सोलार, पर्यटन, मत्स्यपालन याविषयी धोरणात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आठवडाभरात याविषयी निविदा काढून स्वारस्य जाणून घेतले जाईल..Saklai Irrigation Project: साकळाई उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने सुरू करा.उपसा सिंचन योजना कार्यान्वित असलेले प्रकल्प सोलारवर आणले जातील. विष्णुपुरी प्रकल्पासाठी जमिनीवर सोलार प्रकल्प उभा केला जाईल. जायकवाडी, माजलगाव, ईसापूर, ओझरखेड, पूर्णा, भंडारदरा व निळवंडे या प्रकल्पांवर पर्यटन विकसित केले जाईल. त्याला बैठकीत मान्यता दिली..दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांना सल्लागार म्हणून नेमले आहे. यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. उपलब्ध साधनांचा वापर करून पर्यटन विकसित केले जाईल. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची ३५ हजार एकर जमीन नावावर नव्हती ती करून घेतली. अनेक ठिकाणी त्यावर अतिक्रमण आहे ती निष्काशीत करण्याचे काम सुरू आहे..Irrigation Project: ‘चणकापूर’मधून डावा कालवा प्रस्तावित करा.१८०० कोटींची थकबाकीगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची सुमारे १८०० कोटींची थकबाकी आहे. आजवर तीनशे कोटींच्या पुढे न सरकणारी पाणीपट्टी वसुली यंदा विक्रमी ५२० कोटींवर केली आहे. अंदाजे १००० कोटी निव्वळ पाण्याची थकबाकी असावी. आपण ७०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिलेले आहे, असेही विखे पाटील म्हणाले..आकृतिबंधानुसार पुनर्रचनाशासनाने मान्यता दिलेल्या आकृतिबंधानुसार पुनर्रचनेचे काम हाती घेतले जाईल. त्याविषयी महिनाअखेर प्रत्यक्ष हालचाल सुरू होईल. एक खिडकी प्रमाणे एकच मुख्य अभियंता आणि त्यांच्या अंतर्गत सर्व विभाग अशी पुनर्रचना करण्याचे काम सुरू केले जाईल, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.