Jalna News : मागील आठवड्यात गोदावरी नदीला पूर आला. या पुराने गोदाकाठच्या गावांना वेढा पडला होता. त्यामुळे पिके, घरांची पडझड, जनावरे दगावून मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर गावात पूर शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले. यामुळे पुन्हा जिल्ह्यातील ३९ गावांचा पुनर्वसनाचा ऐरणीवर आला. .वर्ष २००६ मध्ये जो महापूर आला होता त्यावेळी सर्वोच्च २ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने मोठा पूर आला होता. त्याचा जालना जिल्ह्यामध्ये एकूण ३९ गावांना फटका बसला. यामध्ये अंबड तालुक्यातील १६, घनसावंगी १८, परतूरच्या पाच गावांचा समावेश होता. विशेष म्हणजे सदर विसर्ग हा धोक्याच्या पातळीचा होता. दरम्यान, यंदा जिल्हा रेड अलर्टमध्ये असलेल्या स्थितीमुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता पाहता २००६ मधील पुराच्या स्थितीपेक्षा भयानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका होता. .Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य .मात्र, जायकवाडी प्रशासन, पोलिस प्रशासन आणि इतर स्थानिक प्रशासन रात्रभर पूरस्थितीवर लक्ष ठेवून होते. या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आल्याने जीवितहानी झाली नाही. या पुराच्या स्थितीमुळे अनेकांची जनावरे दगावली, घरांची पडझड झाली, तसेच जनावरे असेलल्या नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला आपला संसार मांडून जनावरांना पुराच्या तडाख्यातून वाचविण्याचा प्रयत्न केला..त्यामुळे या गावातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न पुढे आला आहे. संबंधित गावांतील कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्या गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या वतीने २००६ मध्ये तयार करण्यात आला. ज्या गावांचे पूर्णतः पुनर्वसन करण्याची गरज आहे त्या गावातील लाभार्थींची संख्या व त्यांना संपादित करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन, शासकीय गायरान जमीन उपलब्ध नसल्यास या गावात खासगी जमीन खरेदी करणे, नागरी सुविधा निर्माण करणे या बाबींसाठी निधीसह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला..Village Rehabilitation: गावाच पुनर्वसन करा, गोळेगावच्या महिलांनी मांडली व्यथा .मात्र, या प्रस्तावाला आता जवळपास १९ वर्षे झाली तरी गोदाकाठच्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या संबंधी शासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने येथील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे..घनसावंगी तालुक्यात २००६ मध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे अठरा गावांना फटका बसला. या गावांतील कुटुंबाचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यावेळी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप शासनदरबारी हा प्रस्ताव प्रलंबित आहे.–पूजा वंजारी, तहसीलदार, घनसावंगी.गोदावरी नदीच्या उजव्या आणि डाव्या तीरावरील गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊन पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरते. त्यामुळे या गावातील नागरिक, शेती, घरांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा.- सतीश कदम, नागरिक बानेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.