Chh. Sambhajinagar News : गोदावरी नदीवरील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात आवकेनुसार घट वाढ करणे सुरू आहे. सोमवारी (ता.२९) पहाटे दोन वाजताच्या सुमारास सुमारे ३ लाख ६ हजार क्युसेकवर नेण्यात आलेला विसर्ग सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास २ लाख ७ हजार ५०४ क्युसेकने सुरू होता. .रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरला होता. जायकवाडीतून विसर्ग वाढीमुळे गोदावरी नदी पात्रात व काठावर मात्र पूरस्थिती कायम होती. जायकवाडी प्रकल्पातून गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी काठावरील पैठण तालुक्यातील सुमारे बारा गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. .दुसरीकडे इतर ओढ्या नाल्यांचे व नद्यांचे पाणी थबकल्याने शेत शिवार जलमय झाले पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली. पैठण प्रमाणेच पुढे जालना, बीड, परभणी आदी जिल्ह्यातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अलर्ट मोडवर असलेल्या प्रशासनाकडून गावोगावी जाऊन गावकऱ्यांना सतर्क करण्याचे व स्थलांतरित करण्याचे काम केले रविवारी रात्री उशिरापर्यंत व सोमवारी पहाटेपर्यंत केले जात होते..Jayakwadi Project : जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ८०० कोटी खर्च करणार.अशी झाली विसर्गात घट वाढरविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जायकवाडीत सुमारे २ लाख ७५ हजार १६८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्याचवेळी प्रकल्पातून २७ दरवाजांपैकी १० ते २७ दरम्यानचे दरवाजे साडेपाच फूट व एक ते नऊ क्रमांकाचे आपत्कालीन दरवाजे चार फूट उघडून सुमारे १ लाख ७९ हजार २०८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात केला जात होता. रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जायकवाडीत ३ लाख २४ हजार ९१७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. .त्यामुळे विसर्ग २ लाख ५४ हजार ६६४ क्युसेक करण्यात आला. त्यावेळी नियमित १८ दरवाजे साडेनऊ फूट तर आपत्कालीन ९ दरवाजे आठ फूट उघडण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री मात्र आवक ३ लाख ६ हजार ५४० क्युसेकवर गेल्याने विसर्ग ही ३ लाख ६ हजार ५४० क्युसेक करण्यात आला. त्यावेळी १८ दरवाजे साडेअकरा फूट तर आपत्कालीन नऊ दरवाजे साडेआठ फूट उघडण्यात आले होते. सोमवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास आवक २ लाख ७१ हजार ५७३ क्युसेकवर गेली. .Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ ९९.२८ टक्क्यांवर .त्यावेळी जायकवाडीचे नियमित १८ दरवाजे १२ फूट उघडून व आपत्कालीन ९ दरवाजे साडेआठ फूट उघडून सुमारे ३ लाख ६ हजार ५४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू करण्यात आला. सोमवारी पहाटे ८ वाजताच्या सुमारास विसर्गात दोन लाख ४५ हजार २३२ क्युसेकपर्यंत घट करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पुन्हा विसर्ग २ लाख ७ हजार ५०४ क्युसेकवर तर दुपारी १२ वाजता सुमारे १ लाख ८८ हजार ६४० क्युसेकवर आणण्यात आला. .त्यावेळी प्रकल्पात २ लाख ३५ हजार ४७४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सोमवारी दुपारी १ वाजता प्रकल्पात १ लाख ७४ हजार ६२१ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असताना गोदावरीच्या नदीपात्रातील विसर्गात पुन्हा वाढ करत २ लाख ७ हजार ५०४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. .त्यावेळी नियमित १८ दरवाजे आठ फूट तर आपत्कालीन नऊ दरवाजे सहा फुट उघडण्यात आले होते. पैठण शहरातील कहारवाडा, परदेशीपुरा, संतनगर, नाथ मंदिर परिसर, गागाभट्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी चौक आदी परिसरात पाणी शिरले होते शिवाय नदीकाठच्या गावांनाही मोठा धोका निर्माण झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.