Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी व दारणा नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात जनजीवन विस्कळित झाले होते. मात्र, शुक्रवार (ता. २२) रोजी गोदावरी नदीचा पूर ओसरल्यामुळे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले आहे. .इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यांत झालेल्या या संततधारेने पूरस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवार (ता. २२) रोजी गंगापूर धरणातून विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करून तो बंद करण्यात आला आहे. पंचवटी परिसरात पूर असल्याने रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली होती. .Pandharpur Flood : पंढरपुरात पूरस्थिती; प्रशासन सतर्क.तर अस्थायी स्वरूपाची दुकाने स्थलांतरित झाली होती. मात्र आता पाऊस थांबल्यानंतर विसर्ग बंद करण्यात आल्याने पूर ओसरला आहे. त्यामुळे फळे, साहित्य विक्रेत्यांसह भाविक व पर्यटकांची गर्दी देखील रामकुंडावर पाहायला मिळाली..गोदावरी व दारणा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर नांदूर मधमेश्वरकडे गेल्याने निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठच्या शेतामध्ये गोदावरीचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली होती..Maharashtra Flood Situation: सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम; नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान.दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पुराची पातळी कमी झाल्याची स्थानिक नागरिकांनी सांगितले..धरणातून सुरू असलेला विसर्ग (ता.२२ रोजी दुपारी ३वाजता)धरण विसर्ग(क्युसेक्स)दारणा ६०२४गंगापूर .बंदमुकणे ३६३वालदेवी ८१४आळंदी २४३भावली ९४८भाम २१७०वाघाड १३३३तिसगाव ७१करंजवन ६९३वाकी ६१६कडवा ११७६पालखेड ३१९२पुणेगाव १५०ओझरखेड १२४नांदुर मधमेश्वर ३१२८३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.