Nagpur News: ‘‘बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येत असल्याने जंगलामध्ये जास्तीत जास्त शेळ्या सोडण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. तसेच बिबट्यांना पकडण्यासाठी मागणी केल्यास तातडीने पिंजरे उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील,’’ अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली..राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला नाईक यांनी उत्तर दिले. राज्यात विविध भागांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली असून, मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे..Leopard Terror: मोखाड्यात बिबट्यासाठी पिंजरा.अहिल्यानगर व नाशिक या जिल्ह्यांत वीस जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही बिबट्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात ५००० पेक्षा जास्त बिबटे असल्याचे सदस्यांचे म्हणणे असून वन विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार २२८५ बिबटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी लक्षवेधीद्वारे करण्यात आली..काँग्रेसचे नाना पटोले, जुन्नर (जि. पुणे) येथील आमदार शरद सोनवणे यांच्यासह अन्न सदस्यांनी बिबट्यांना पकडण्यासाठी जेथे मागणी होईल तेथे तातडीने पिंजरे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली..Wildlife Management: हल्ले रोखण्यासाठी बिबट्यांना कोंबडे, बकरे खाऊ घालणार: वनमंत्री गणेश नाईक.श्री. नाईक यांनी सांगितले, की बिबट्यांना मानवी वस्तीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या संख्येने शेळ्या जंगलात सोडाव्यात. बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तर १ कोटी रुपये भरपाई द्यावी लागते. मृत्यूनंतर भरपाईऐवजी १ कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडा जेणेकरून बिबटे मानवी वस्तीत येऊ नयेत..अहिल्यानगरमध्ये नवीन बचाव केंद्र प्रस्तावितश्री. शरद सोनवणे म्हणाले, ‘‘माझ्या मतदार संघात बिबट्यांचा धोका सर्वाधिक आहे. जिथे बिबट्यांच्या हल्ल्यात ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्या मतदार संघात एक बचाव केंद्र आहे, त्याची क्षमता वाढविली पाहिजे.’’ यावर श्री. नाईक म्हणाले, ‘‘राज्याने जुन्नरमधील बिबट्या बचाव केंद्राची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिबट्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी अहिल्यानगरमध्येही एक नवीन बचाव केंद्र प्रस्तावित आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.