डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. व्ही. के. कदम भारतातील एकूण पशुधनाच्या संख्येपैकी शेळ्यांचे योगदान सुमारे २७.८ टक्के आहे. विसाव्या पशुगणनेनुसार राजस्थानमध्ये सर्वाधिक शेळ्यांची संख्या (२०.८४ दशलक्ष) आहे. महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर (१०.६० दशलक्ष) आहे. यांपैकी, २७.४ टक्के शुद्ध जात (स्वदेशी शेळ्या), ९.१ टक्के श्रेणीबद्ध जाती आणि उर्वरित ६३.५ टक्के अवर्णित आहेत. .स्थानिक जातींमध्ये, ब्लॅक बंगाल (पश्चिम बंगाल) जातीचे योगदान सर्वाधिक (१८.६ टक्के) आहे, त्यानंतर मारवाडी, बारबारी (उत्तर प्रदेश), उस्मानाबादी जातींचे प्रमाण अनुक्रमे ३.४ टक्के, ३.२ टक्के, २.४ टक्के आहे. इतर सर्व मान्यताप्राप्त जाती शेळ्यांच्या संख्येपैकी ७.२ टक्के आहेत. देशातील एकूण शेळ्यांच्या लोकसंख्येपैकी सुमारे ७६ टक्के शेळ्या लहान आणि सीमांत कुटुंबांकडे आहेत..शेळी जातीजगभरात सुमारे ५७६ शेळ्यांच्या जाती आहेत. नैसर्गिक निवडीमुळे, शेळ्यांमध्ये शारीरिक विविधतेची विस्तृत श्रेणी दिसते, ज्यामुळे त्यांना विविध वातावरणाशी जुळवून घेता येते.राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्यूरोकडे देशातील ४१ नोंदणीकृत शेळ्यांच्या जातीची नोंदणी झाली आहे. या शेळ्या मोठ्या, मध्यम आणि लहान जातींमध्ये वर्गीकृत आहेत.शेळ्यांचे वितरण कृषी हवामानानुसार वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये उपयुक्ततेनुसार कमी अधिक दिसून येते. समशीतोष्ण हिमालयीन प्रदेशातील शेळ्या, जसे की चांगथांगी, गड्डी आणि चेगू या जाती मुलायम केस उत्पादनासाठी सुप्रसिद्ध आहेत.उत्तर आणि वायव्य प्रदेशातील शेळ्यांच्या जाती आकाराने मोठ्या असतात. या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये जमुनापारी, बीटल, जखराणा आणि सुरती जातींचा समावेश आहे.दक्षिण आणि द्वीपकल्पीय भागात, दुहेरी उपयुक्तता असलेल्या (मांस आणि दूध) शेळ्या आढळतात. यामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी आणि कन्नियाडू या जातींचा समावेश आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात ब्लॅक बंगाल ही उच्च मांस उत्पादन क्षमता असणारी जात आढळून येते..Goat Farming: शेडमध्येच जातिवंत पैदाशीवर भर.पूरक उद्योगासाठी उपयुक्तशेळ्यांपासून दूध, मांस, केस, कातडी ही उत्पादने मिळतात. यामुळे कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. शेळीपालन हे महिला, कामगार आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.शेळी आणि तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांचा लहान शेतकऱ्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात १५ ते २७ टक्के वाटा असतो. शेळीचे दूध आणि मांस घरगुती पोषण वाढवते. त्यांच्या सहज पचनयोग्यतेमुळे आणि संभाव्य औषधी गुणधर्मांमुळे मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना फायदा होतो.शेळ्या सामान्यतः ३ ते १० संख्येच्या गटात पाळल्या जातात. ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात, ज्यामुळे गरिबी निर्मूलनात मदत होते. सातत्याने पूरक उत्पन्न मिळते..Goat Farming : यशस्वी शेळीपालनातील विशाल.शेळ्यांमध्ये उच्च खाद्य रूपांतरण कार्यक्षमता आहे. लहान आकार, कमी दर्जाच्या चाऱ्याचा कार्यक्षम वापर, विविध खाद्य संसाधनांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि उष्णता, दुष्काळ सहन करण्याची क्षमता तसेच रोग प्रतिकारशक्तीमुळे शेळ्यांचे संगोपन फायदेशीर ठरते. वाळवंट, किनारी प्रदेश आणि उंचावरील प्रदेशांमध्ये शेळ्या हे उपजीविकेचे एक विश्वसनीय साधन आहेत.शेळीच्या दुधाचे आरोग्य फायदे आणि वाढत्या मागणीमुळे लहान शेळीपालकांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. शेळीचे दूध सहजपचण्याजोगे असते, यात औषधी गुणधर्म असतात. ॲलर्जी समस्या असलेल्यांसाठी हे दूध फायदेशीर ठरते. दुधापासून चीज, दही, आंबवलेले पेय, आइस्क्रीम, शिशू आहार आणि सौंदर्यप्रसाधने तयार करता येतात..मांस, चामडे उत्पादनाचा आलेखभारत हा जगातील सर्वात मोठा मेंढ्या आणि शेळीचे मांस निर्यात करणारा देश आहे. देशातील एकूण मांस उत्पादन ९.७७ दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण मांस उत्पादनात शेळीचे मांस उत्पादन सुमारे १४.४७ टक्के आहे.सर्वांत मोठे मांस उत्पादक राज्य म्हणून उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. या राज्यात देशातील एकूण मांस उत्पादनापैकी १२.२० टक्के उत्पादन होते. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. या राज्याचा मांस उत्पादनामध्ये ११.९३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्र हे देशातील तिसरे मांस उत्पादक राज्य आहे. देशातील एकूण मांस उत्पादनापैकी सुमारे ११.५० टक्के उत्पादन होते..शेळीचे चामडे प्रक्रिया हा देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. दरवर्षी देशात ०.१८ दशलक्ष टन चामडे निर्मिती होते. शेळीचे चामडे मऊ, टिकाऊपणासाठी उपयुक्त आहे. हे चामडे पिशव्या, बूट, हातमोजे आणि पारंपारिक बुक बाइंडिंगसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाते.पश्चिम बंगालमधील ब्लॅक बंगाल जात उच्च दर्जाच्या चामड्यासाठी प्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर आशिया खंड शेळीच्या चामडे उत्पादनात आघाडीवर आहे. एकूण उत्पादनाच्या ७६.५५ टक्के वाटा आशिया विभागाचा आहे. चीन आणि भारत हे प्रमुख चामडे उत्पादक देश आहेत.मुलायम केस उत्पादनासाठी भारतातील चांगथांगी शेळी आणि अंगोरा शेळ्या मोहेर उत्पादनासाठी ओळखल्या जातात.- डॉ. जी. एस. सोनवणे ८७९६४४८७०७(सहायक प्राध्यापक (पशू अनुवंश व पशू पैदास विभाग), क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.