Palghar News: ग्लोबल कोकण महोत्सव २०२६अंतर्गत शिरगाव बीच येथे आयोजित ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. राज्याच्या औद्योगिक व निर्यात क्षमतेला चालना देणाऱ्या या उपक्रमात प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि नवउद्योजकांचा सहभाग दिसून आला..हा कार्यक्रम विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री तसेच सहसंचालक (उद्योग) विजू सिरसाठ उपस्थित होते. .Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल.अप्पर जिल्हाधिकारी फटांगरे यांनी नोकरी घेणारे नव्हे, नोकरी देणारे व्हा, असे आवाहन करीत किनारी, डोंगरी व नागरी भागात वाढणाऱ्या औद्योगिक संधींचा लाभ घेण्यास युवकांना सांगितले. उपविभागीय अधिकारी खत्री यांनी स्थानिक प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट करीत थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. सहसंचालक सिरसाठ यांनी प्रास्ताविकात पालघर जिल्ह्याने मागील वर्षी तब्बल रु. ३०,१३८ कोटींची निर्यात साध्य केल्याची माहिती दिली..Global Agri Festival : नारायणगाव केव्हीकेत ९ पासून ‘ग्लोबल कृषी महोत्सव’ .‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत चिकू व सागरी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवउद्योजकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले. उद्योग प्रतिनिधींनी निर्यात प्रोत्साहन परिषदांची भूमिका, विमा संरक्षण, वित्तीय सहाय्य, कौशल्य विकास व इज ऑफ डुइंग बिझनेस सुधारणा यांवर मार्गदर्शन केले..पर्यटन क्षेत्रातील होमस्टे, रिसॉर्ट व हॉटेल प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्यांबाबतही माहिती देण्यात आली. कार्यशाळेअंती प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र, रोटरी क्लब ऑफ विरार, एमसीईडी आणि मिटकॉन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी ठरला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.