Sugarcane Price: उसाला तीन हजार ५५० रुपये भाव द्या
Farmers Protest: शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य सन्मान देत साखर कारखान्यांनी उसाला तीन हजार ५५० रुपये प्रतिटन एफआरपी द्यावा, अन्यथा युवा शेतकरी संघर्ष समिती तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा गुरुवारी (ता. १८) तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथे आयोजित इशारा मेळाव्यात देण्यात आला.