Water Scarcity: जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात भूजल पातळी दिवसागणिक खालावत असून, विहिरी व कूपनलिकांतील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे केळी व अन्य बागायती पिके कशी वाचवावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे..गिरणा पट्ट्यात २०२५ मध्ये चांगला पाऊस झाला होता. त्या वेळी ओल्या दुष्काळाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. टंचाई निवारणासाठी गिरणा नदीत तीन वेळा आवर्तन सोडण्यात आले. तरीही नदीकाठच्या भागात पाणीटंचाई कायम आहे..Ground Water Level : भूजल पातळीत मोठी वाढ.नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा झाल्याने पाण्याचे झिरपणे कमी झाले आहे. परिणामी विहिरी आणि कूपनलिकांचे पुनर्भरण होत नसल्याची स्थिती आहे. नदीकाठच्या शिवारातही अपेक्षित जलसाठा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेकांना नव्याने पीक लागवड करणे कठीण झाले आहे..गिरणा पट्ट्यातील सर्वच प्रकल्पांतील जलसाठा घटला असून, गिरणा धरणातील साठा ३२ टक्क्यांखाली गेला आहे. धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी असली तरी सध्या उपयुक्त जलसाठा कमालीचा घटला आहे. लहान-मोठे तलावही आटत चालले आहेत. पाऊस लांबल्यास बागायती शेती मोठ्या संकटात येण्याची भीती व्यक्त होत आहे..Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरीपेक्षा खालावली.पाचोरा, चाळीसगाव आणि भडगाव परिसर केळी, लिंबू व अन्य फळपिकांसाठी ओळखला जातो. मात्र उष्णता आणि घटती जलपातळी यामुळे शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागत आहे. विजेचा पुरवठाही नियमित नसल्याने अडचणी वाढल्या आहेत..गेल्या २५ ते ३० दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वी कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सध्या देखील ४३ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे..अधिक तापमानात केळी पीक तग धरत नसल्याचे शेतकरी सांगतात. लहान केळी पिकाला दररोज किमान पाच तास, तर मोठ्या केळीला सात ते आठ तास पाणी देणे आवश्यक असते. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा व परिसरातील केळी बागांना उष्णता आणि पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शेतकरी रात्रंदिवस पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेकांनी नव्याने फळपिकांची लागवडही बंद केली आहे..ठळक बाबी मुद्दा तपशील समस्या भूजल पातळी झपाट्याने घटली प्रभावित भाग गिरणा पट्टा, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव प्रमुख कारणे वाळूउपसा, वाढता पाणी वापर गिरणा धरण साठा ३२ टक्क्यांखाली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.