Nashik News : गिरणा धरण लाभक्षेत्रातील झालेल्या दमदार पावसामुळे धरणाची वाटचाल शंभरीकडे होत आहे. जिल्ह्यातील धरणाच्या वरच्या भागात गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून, अनेक धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. .नाशिक-जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले गिरणा धरण ९०.०३ टक्के भरल्याने गत वर्षीच्या तुलनेत लवकरच शंभरी गाठणार आहे. निम्म्याहून अधिक जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या उगम स्थानावर असलेल्या ठेंगोडा धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हे धरण ओव्हरफ्लो झाले असून मोठ्या प्रमाणावर विसर्गाने पाणी गिरणा नदीपात्रात सोडले जात आहे..Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले .जळगावला फायदाचणकापूर ८५.५८ टक्के भरले असून ७७९ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. हरणबारी व केळझर धरणे शंभर टक्के भरून अनुक्रमे ८४६ व ३८८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गिरणा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होईल.गिरणा धरण २०२४ पर्यंत सलग चौथ्या वर्षी शंभरी गाठली होती. .यंदाही लवकरच शंभर टक्के भरेल. जिल्ह्यातील पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली, ज्याचा फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह या धरणावर अवलंबून असलेल्या मच्छीमार व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक खूष झाले आहेत..Water Storage : लहानमोठ्या प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा.धरणाच्या शंभरीकडे वाटचालीने दोन्ही जिल्ह्यांतील खवय्ये व पर्यटकांची भटकंती मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.दरम्यान दोन दिवसांतील पावसामुळे गिरणा व मोसम तिसऱ्यांदा खळाळल्या असून या दोन्ही नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गिरणा व मोसम नद्या भरून वाहत आहे. लहान मोठ्या नद्या व नाल्यांना पाणी आहे..गिरणा खोरे धरण समूह जलसाठाप्रकल्प २०२४ टक्के आजची टक्केवारीचणकापूर ८७.५२ ८५.५८हरणबारी १०० १००केळझर १०० १००नागासाक्या ०० १००गिरणा ९४.०९ ९०.०३पुनंद -७५.१० ८६.५४माणिकपुंज २.८३. १००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.