Water Management: चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी यंदा बिगर सिंचनासाठी तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. आता चौथ्या आवर्तनाची प्रतीक्षा असून, ते जूनच्या मध्यात सोडले जाण्याची शक्यता आहे..गिरणा धरणातून नदीपात्रात बिगर सिंचनासाठी साधारणपणे पाच वेळा आवर्तन सोडले जाते. यातील मागील आवर्तन मे महिन्याच्या सुरुवातीला सोडण्यात आले होते. हे पाणी कानळदा (ता. जळगाव) येथे पोहोचल्यानंतर आवर्तन बंद करण्यात येते. या पाण्याचा लाभ नदीकाठच्या गावांना होत असल्याचे प्रशासनाने सांगितले..Girna Dam Water Release: टंचाई निवारणासाठी गिरणा धरणातून आवर्तन.एप्रिलमध्ये नदीत आवर्तन सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मेच्या सुरुवातीलाच आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. २०२५ च्या पावसाळ्यात गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. धरणातून रब्बी हंगामासाठीही पाणी देण्यात आले होते. तसेच टंचाई निवारणासाठी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे..Ahilyanagar Dams Water Level: अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत ३५ टक्क्यांवर पाणीसाठा.धरणातून सुमारे दोन हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. या आवर्तनाचा लाभ चाळीसगाव शहरासह भडगाव, पाचोरा येथील पिण्याच्या पाणीपुरवठ्यास झाला. तसेच नदीवरील दहिगाव व दापोरा येथील बंधाऱ्यांमध्येही पाणी पोहोचले. नदीकाठच्या सुमारे १४० गावांतील शिवार आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत यामुळे बळकट होत असल्याचे सांगण्यात आले..धरणातून पाणी सोडल्यानंतर ते कानळदापर्यंत पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. कानळदा येथे पाणी पोहोचल्यानंतर आवर्तन बंद केले जाते. त्यापुढे तापी नदीचे स्रोत उपलब्ध असल्याने गिरणाचे पाणी तेवढ्याच टप्प्यापर्यंत दिले जाते. मात्र, कानळदापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर किमान दोन दिवस नदीपात्रात प्रवाह कायम ठेवावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच चौथे आवर्तन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सोडावे, अशीही मागणी होत आहे..२०२३ मध्ये पाण्याची टंचाईगिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असले, तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्याला होतो. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल आणि धरणगाव भागात गिरणाच्या पाटचाऱ्या आहेत. २०२३ च्या पावसाळ्यात धरण केवळ ५६ टक्के भरल्याने त्यातून रब्बीसाठी आवर्तन देण्यात आले नव्हते. त्या काळात फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आणि टंचाई निवारणासाठीच धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यात उद्योगांसाठीही दोन वेळा पाणी देण्यात आले होते. तसेच टंचाई निवारणासाठी नदीत तीन आवर्तने सोडण्यात आली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.