Water Crisis: गिरणा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण आणि विस्तारीकरण झाल्यास भविष्यात या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर होणार आहे. त्यामुळे सरकारने आधी ‘नार-पार’ योजनेचे पाणी गिरणा खोऱ्यात आणावे, त्यानंतरच विस्तारीकरणाचा विचार करावा, अशी आक्रमक भूमिका गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विराट शेतकरी बैठकीत अस्तरीकरणाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला..ज्ञानदेव अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या वेळी बागलाण तालुक्यातील लखमापूर, ब्राह्मणगाव, आराई, ठेंगोडा, शेमळी, यशवंतनगर, धांद्री, अहिल्यानगर यांसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. ‘आधी नार-पार, मगच गिरणा विस्तार’ अशा आशयाचे फलक हातात धरून शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या सध्याच्या स्वरूपाला विरोध दर्शविला..Nar-Par Girna Project: नार पार -गिरणा प्रकल्पाबाबत सरकारची अनास्था.शक्ती दळवी म्हणाले, की मंत्री दादा भुसे यांनीही शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आधी हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे मत व्यक्त केले आहे. प्रा. के. एन. अहिरे यांनी तांत्रिक बाजू मांडताना स्पष्ट केले की, या कामासाठी वर्क ऑर्डर निघाली असली तरी अस्तरीकरण झाल्यास जमिनीतील पाणीपातळी खालावून शेती व्यवसाय धोक्यात येईल..डॉ. विलास बच्छाव यांनी ही लढाई सर्वांची असल्याचे सांगत एकजुटीचे आवाहन केले, तर संजय देवरे यांनी ‘‘अस्तरीकरण म्हणजे केवळ ठेकेदारांचे हित जोपासण्याचा प्रकार आहे,’’ अशी घणाघाती टीका केली. अशोक थोरात, राघो अहिरे, गजेंद्र चव्हाण, बाळासाहेब अहिरे यांनीही मनोगतातून विस्तारीकरणाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला..Nar-Par-Girna Project : नार-पार-गिरणा प्रकल्प निवडणुकीत चर्चेत.‘गिरणा डावा कालवा संघर्ष समिती’ची स्थापनाया लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातून दोन प्रतिनिधी निवडून ‘गिरणा डावा कालवा संघर्ष समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती आगामी काळात सरकारविरोधात तीव्र लढा उभारणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले..बैठकीतील ठळक मुद्देकालव्याच्या अस्तरीकरणामुळे भूगर्भातील पाणी झिरपणे बंद होऊन विहिरी कोरड्या पडण्याची भीती.गिरणा धरणात आधी ‘नार-पार’ योजनेद्वारे अतिरिक्त पाणी आणल्यासच विस्तारीकरण शक्य.पंचक्रोशीतील गावांचा लढा उभारण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीची स्थापना..गिरणा डावा कालवा वाचविण्यासाठी आताच प्रयत्न केले नाहीत, तर भविष्यात शेती व्यवसाय संकटात सापडेल. हा लढा केवळ पाण्यासाठी नसून आपल्या अस्तित्वासाठी आहे. जोपर्यंत ‘नार-पार’चे पाणी येत नाही, तोपर्यंत एक इंचही काम पुढे सरकू देणार नाही.- संजय देवरे, शेतकरी नेते.सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. आधी पाणी द्यावे, मगच कालव्याच्या कामाला हात लावावा. आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलो असून लोकशाही मार्गाने हा अन्याय रोखू.- ज्ञानदेव अहिरे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, ब्राह्मणगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.