Farm Success: खानदेशात गिरणा धरणातील पाण्यामुळे रब्बी हंगाम गिरणा पट्ट्यात जोमात होता. हंगाम हाती आला आहे. यातच रब्बीच्या कालावधीत वादळी पाऊस, गारपिटीचे संकट न आल्याने हंगाम बऱ्यापैकी दिसत असल्याची स्थिती आहे..काढणी, मळणीचे काम सुरळीत झाले. पण आता उष्णता वाढत असल्याने काहीशा अडचणीही येत आहेत. गिरणा नदीवरील गिरणा धरण खानदेशातील सर्वात मोठे धरण आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु त्याचा सर्वाधिक लाभ जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव आदी भागास आहे. नाशिकमधील मालेगाव शहर, नांदगाव शहर आणि मालेगावातील उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते. तसेच जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांसह १२० गावांच्या पाणी योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. यंदा गिरणा धरण १०० टक्के भरले होते. गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरवर रब्बी हंगामास लाभ मिळत आहे..Rabi Season: रब्बी हंगामात आशेची हिरवळ.गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी क्षेत्र आहे. या भागातील लहान-मोठे तलाव, मध्यम प्रकल्पही भरले होते. चाळीसगावातील मन्याड, पाचोऱ्यातील, अग्नावती, बहुळा, पारोळ्यातील भोकरबारी, बोरी, एरंडोलातील अंजनी आदी प्रकल्पांत जलसाठा मुबलक होता..Rabi Season: ‘गिरणा’ पट्ट्यात रब्बी जोमात.बोरी प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा असल्याने पारोळ्यातील मोठ्या क्षेत्रास लाभ होत आहे. पाण्याचा वापर यंदाही अधिक आहे. तामसवाडी, भोकरबारी व म्हसवे प्रकल्पात पाणी असल्याने जलसंकट दूर झाले आहे. सावखेडा येथील इंदासी प्रकल्पदेखील भरला. तामसवाडी प्रकल्पातून तामसवाडी, बोळे, शेवगे, टोळी, पिंप्री, मुंदाणे, हिवरखेडा आदी गावांना पिण्याचे पाणी मिळाले. याचा लाभ रब्बीस झाला. यंदा रब्बीसह केळी, भाजीपाला पिकांत गिरणा पट्टा आघाडीवर आहे. हंगाम साध्य झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण शेतमालाचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे..गिरणा धरणासह सर्व प्रकल्प तुडुंब भरले;पाण्याची मुबलक उपलब्धतासुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगाम फुललाकाढणी व मळणीची कामे सुरळीत पार पडलीगारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसला नाहीकेळी व भाजीपाला पिकांत चांगले उत्पादनलहान-मोठ्या प्रकल्पांमुळे जलसंकट टळलेवाढत्या उष्णतेमुळे काही अडचणी निर्माणउत्पादन भरघोस; मात्र बाजारभाव कमी असल्याने शेतकरी नाराज