Madhya Pradesh Gir Cow Milk Yield: मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील एका गीर गोवंशाच्या गायीने दूध उत्पादनाचा नवा विक्रम केला. तालोद गावातील 'राधा' नावाची गीर गाय ही मध्य प्रदेशातील सर्वाधिक दूध देणारी गाय ठरली आहे. पशुपालक गौरव रघुवंशी यांच्या मालकीची ही गाय आहे. तिने दररोज सरासरी १९.७६ लिटर दूध देत राज्यस्तरीय दूध उत्पादन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. .याबद्दल भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याहस्ते सदर पशुपालकाचा १ लाख रुपयांच्या रोख रमकेसह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून गोपाल-कृष्ण ग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान दूध स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यासाठी राज्यातील २०८ गावांतील दूध उत्पादकांनी त्यात सहभाग नोंदवला होता. ही गावे 'वृंदावन ग्राम' म्हणून घोषित करण्यात आली आहेत. देशी गोवंश संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी या गावांची निवड केली आहे. .Dairy Farming: गीर गाईच्या दुधापासून प्रक्रियायुक्त उत्पादने.सर्वाधिक दूध देणाऱ्या पहिल्या पाच गायींपैकी चार गायी ह्या गीर गोवंशाच्या आहेत. यात उज्जैन जिल्ह्यातील राधा गीर गायीने दररोज १९.७६० लिटर दूध उत्पादनासह प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर रतलाम जिल्ह्यातील सुखेडा गावातील गायीने दररोज १७.२३० लिटर दुधासह दुसरा क्रमांक मिळवला. तर उमरिया जिल्ह्यातील गायीने १७.१६६ लिटर दुधासह तिसरा, रायसेन जिल्ह्यातील गायीने १६.३५० लिटर, तर राजगड जिल्ह्यातील गायीने दररोज १६.१४४ लिटर दुधासह अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला. पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या पशुपालकांना अनुक्रमे १ लाख रुपये, ५० हजार रुपये आणि २५ हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. .Gokul Milk Price Difference: 'गोकुळ'कडून म्हैस दुधास प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे, गाय दुधास १ रुपये २५ पैसे फरक जमा, दूध उत्पादकांना दिलासा .राधा आमच्यासाठी केवळ एक गाय नसून, ती आमच्या कुटुंबातील एक खूप महत्त्वाची सदस्य आहे, अशी भावना पशुपालक रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तालोद गाव हे 'वृंदावन ग्राम' म्हणून घोषित केले. त्यानंतर त्यांनी ही गीर गाय विकत घेतली होती. तिची आम्ही नियमित काळजी घेतली. तिच्या संतुलित आहाराकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच ती अधिक दूध देणारी गाय ठरली, असेही त्यांनी नमूद केले. .गीर ही पश्चिम भारतातील एक देशी गोवंश जातीची गाय आहे. ही गोवंश काटक आहे. शुद्ध जातीची एक गीर गाय दररोज सरासरी ६ ते १२ लिटर दूध देते. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. दुग्धव्यवसाय हा शेतीशी पूरक असलेला ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे. देशातील दूध उत्पादनात मध्य प्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.