Illegal Fish Farming: प्रतिबंधित थाई मागूर माशांच्या बेकायदा संवर्धनाविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पारशिवणी तालुक्यात मोठी कारवाई केली. घुकसी गावातील ११ तलावांमध्ये सुरू असलेल्या थाई मागूर संवर्धनाचा भंडाफोड करत तब्बल १६ टन मासे जप्त करून नष्ट केले. .मत्स्यव्यवसाय विभागाला पारशिवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित थाई मागूर माशांचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त पथकाने घुकसी येथे छापा टाकला. .Fish Drying Methods: मासळी सुकविण्याची लगबग.तपासादरम्यान भूमापन सर्वे क्रमांक ४८ परिसरातील ११ तलावांमध्ये थाई मागूर माशांचे संगोपन सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाईदरम्यान तलावांमध्ये जाळे टाकून मासे बाहेर काढण्यात आले. .Thai Magur Fish: थाई मागुळ मासे विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई.या तलावांतून एकूण १६ टन प्रतिबंधित थाई मागूर मासे आढळून आले. जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा प्रशासनाच्या उपस्थितीत खड्डा खोदून नष्ट करण्यात आला..ही कारवाई साहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार, तहसीलदार सुरेश वाघचौरे, ठाणेदार किशोर शेरकी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत वैद्य, अश्विनी टेकाम, निखिल नरड, तसेच पाली उमरीचे सरपंच शुभम राऊत, उपसरपंच भूपेंद्र खोब्रागडे आणि बंटी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.