Crop Stress: घनसावंगी तालुक्यात पावसाने तब्बल एका महिन्यापासून दडी मारली. त्यामुळे कोरडवाहू शेती अक्षरशः संकटात सापडली आहे. पावसाच्या या लांबलेल्या खंडाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला असून, पिके आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सद्यःस्थितीत कडक ऊन आणि जमिनीतील ओलावा संपल्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे..जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठी आशा बाळगून सोयाबीनची पेरणी केली. पिके वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात असतानाच ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ ओढ दिली. गेल्या चार आठवड्यांपासून पावसाचा पत्ता नसल्याने पिके मान टाकून सुकत चालली आहेत. सोयाबीनला सध्या शेंगा भरत असताना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. .Soybean Farming: सोयाबीनला पावसाची नितांत गरज; शेतकऱ्यांना चिंता.मात्र, पाण्याअभावी शेंगा पोसत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट होणे आता अटळ मानले जात आहे. काही ठिकाणी झाडे पूर्णपणे पिवळी पडून जळू लागली आहेत. परिस्थिती कापसाच्या पिकाची असून पाण्याची सुविधा उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन या पिकाला तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; परंतु पाण्याची वेळ एक वेळा पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पाण्याची पातळी खाली जात असल्याने पुन्हा पिकावर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Soybean Crop Damage: पावसाची दडी, धाराशिवमध्ये सोयाबीनचं उभं पीक वाळलं, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज.ज्यांच्याकडे सिंचनाची कोणतीही सोय नाही अशा कोरडवाहू शेतकऱ्यांना आता फक्त आभाळाकडे डोळे लावून बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत किंवा या संपूर्ण आठवड्यात पाऊस न आल्यास कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीन, कापसाचे पीक पूर्णपणे हातातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड होणार आहे..वाढलेला मजुरीचा खर्च, बियाणे-खतांचा झालेला भरमसाट खर्च यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी या दुबार संकटामुळे पूर्णपणे खचला आहे. अनेक भागांत शेतकरी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून पीक विम्याची व आर्थिक मदत द्यावी.- केशव सांगळे, शेतकरी, अंतरवाली राठी.हाती तोंडाशी आलेला घास हिवाळ्याच्या तोंडावरच जाण्याच्या मार्गावर आहे. सततच्या लहरी हवामानामुळे बळिराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला असून, लवकर पाऊस न पडल्यास सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. - अमोल आधुडे, शेतकरी, सिंदखेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.