Sand Smuggling Update: अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून केणींद्वारे अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील पंधरा मुख्य वाळूमाफियांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..गेल्या काही दिवसांपासून गेवराई तालुक्यातील वाळू तस्कर गोदावरी नदीपात्रात पाणी असल्याचा गैरफायदा घेत होते. बीडच्या हद्दीतून नदीपात्रात लांबवर दोरखंड टाकून, ‘केणी’द्वारे अंबड तालुक्याच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात होती. यापूर्वी प्रशासनाने १८, १९ आणि २२ एप्रिल रोजी अचानक धाडी टाकून अनेक केण्यांचे दोरखंड कापून जाळून नष्ट केले होते. मात्र, या कारवाईचा तस्करांवर परिणाम न झाल्याने आणि त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावर यंत्रणा (जेसीबी, पोकलेन, हायवा) लावून शासकीय मालमत्तेची लूट सुरू केल्याने ही कडक पाऊले उचलण्यात आली आहेत..Illegal Sand Mining: वाळू हवीय... पण विकत नको, चोरूनच !.या चौकशीतून हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबूराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे आणि प्रवीण राऊत सर्व माळस पिंपळगाव (ता. गेवराई), बंटी उदे आणि मुकेश कुटे, (सावळेश्वर, ता. गेवराई), शाहरुख अनवर शेख (रा. भांबेरी, ता. अंबड) या व्यतिरिक्त राक्षसभुवन व सुरळेगाव येथील त्यांचे इतर साथीदारही या संघटित गुन्हेगारीत सामील आहेत. ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली..Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा.पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना यापुढे कोणताही थारा दिला जाणार नाही. गुन्हे दाखल केल्यानंतरही जर वाळूतस्करांच्या वर्तनात बदल झाला नाही, तर यापेक्षाही अत्यंत कठोर आणि परिणामकारक कायदेशीर कारवाई केली जाईल.-विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.