Bull Sale and Transportation Investigation: शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रातून गवळाऊ नर वळू खरेदी करून त्याची कत्तलीसाठी विक्री केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोहरा-बोडणा परिसराशी संबंधित या प्रकरणात वळूची विक्री, वाहतूक आणि कत्तलीपर्यंतची साखळी पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. .शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, पोहरा येथून गवळाऊ गोवंशाचे संवर्धन व संगोपन करण्याच्या उद्देशाने नियमानुसार नर वळूची विक्री करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, वळू खरेदी करणाऱ्या चंद्रकांत पुरुषोत्तम ठाकरे यांनी तो स्वतःकडे न ठेवता हरगोविंद प्रभाकर मोहोड यांच्याकडे राखण्यासाठी दिला..Cow Slaughter Ban Law: गोपालक शेतकरी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या; अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा.त्यानंतर मोहोड यांनी तो शेख अहमद शेख इस्माईल याला कत्तलीच्या उद्देशाने विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर शेख अहमद याने सय्यद साबीर सय्यद शब्बीर यांच्या वाहनातून वळू परसोडा येथे नेला..Cow Slaughter Ban Law: कुरेशींचे आंदोलन आणि गोवंश कायद्याचे राज्य.तेथे शेख इस्राईल हुसेन शेख बुरहान आणि अब्दुल सलीम अब्दुल गफार यांना कत्तलीच्या उद्देशाने विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी चंद्रकांत पुरुषोत्तम ठाकरे, हरगोविंद प्रभाकर मोहोड, शेख अहमद शेख इस्माईल, सय्यद साबीर सय्यद शब्बीर, शेख इस्राईल हुसेन शेख बुरहान आणि अब्दुल सलीम अब्दुल गफार या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..विक्री-वाहतूक साखळीचा तपासशासकीय प्रतिज्ञापत्रातील अटींचा भंग करून गोवंशाची अनधिकृत विक्री, वाहतूक आणि कत्तल केल्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. वळूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांची भूमिका, वापरण्यात आलेले वाहन तसेच कत्तलीशी संबंधित इतर बाबींची चौकशी केली जात आहे. ‘‘प्रकरणातील सहभागींची भूमिका, गोवंशाची विक्री व वाहतुकीची साखळी, वापरण्यात आलेले वाहन आणि कत्तलीसंदर्भातील इतर बाबींचा तपास सुरू आहे,’’ असे फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र राजूलवार यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.