डॉ. विजय काळे, वैभव बन्सोड, कु. निशा थोरातकंदवर्गीय पिकांमध्ये कांदा पिकानंतर लसूण लागवड सर्वाधिक होते. भारतात मध्य प्रदेश राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र ही राज्ये लसूण लागवडीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि सातारा हे प्रमुख लसूण उत्पादन करणारे जिल्हे आहेत. प्रति हेक्टर उत्पादन सध्या साधारण ४ टनांच्या आसपास मिळते. मात्र सुधारित जाती व योग्य लागवड तंत्रातून ते १० टनांपर्यंत वाढविणे शक्य आहे. .लसूण हे तापमानास संवेदनशील पीक असल्याने योग्य हंगाम साधणे गरजेचे असते.लागवडीसाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ अनुकूल मानला जातो. देशातील ९० टक्के लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते. वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवामान थोडे थंड व किंचित दमट असावे. हे पीक थंड हवामानाला प्रतिसाद देत असले तरी गड्डा पक्व होताना व काढणीच्या वेळी हवामान कोरडे असावे लागते. लागवडीनंतर सुरुवातीचे ४५ ते ५० दिवस पानांची वाढ जोमदार होते. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस व दिवसाचे २५ त २८ अंश सेल्सिअस असावे. हवेतील आर्द्रता ७० ते ८० टक्के आणि ११ ते १२ तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यानंतर गड्ड्यांचा आकार वाढण्यास सुरुवात होते. वाढीचा हा टप्पा साधारण ३० ते ४० दिवसांचा असतो..Garlic Farming : विदर्भातील फालेंना गवसले लसूण शेतीचे तंत्र .गड्डा तयार होताना दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंडी राहते. शेवटच्या टप्प्यात पाने पिवळसर पडतात, गड्डा सुकतो आणि फुटू लागतो. या वेळी हवेतील आर्द्रता कमी असली पाहिजे. त्यामुळे पाने वाळून गड्डा नीट पक्व होतो..महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करणे गरजेचे आहे. मात्र या वर्षी पावसाळा लांबल्याने खरीप काढणी व त्यानंतरच्या मशागतीला वेळ मिळाला नाही. परिणामी, बहुतांश ठिकाणी लसणाची उशिरा लागवड करावी लागणार आहे. मात्र गड्ड्यांचा आकार लहान राहून उत्पादन घटते. थंड व डोंगराळ प्रदेशात वेगवेगळ्या जाती घेतल्या जातात. त्यात १० ते १२ पाकळ्या असतात. प्रत्येक पाकळी साधारण ४ ते ५ ग्रॅम वजनाची असल्यामुळे गड्डा मोठा असतो. मात्र या जाती महाराष्ट्रातील हवामानात चांगल्या येत नाहीत. येथे पाने चांगली वाढतात, मात्र गड्डा नीट आकार घेत नाही..Garlic Price: लसणाचे दर टिकून; तसेच काय आहेत तूर, वांगी, हळद आणि कोथिंबीरीचे आजचे बाजारभाव .जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत व कसदार जमीन असावी. सामू ६ ते ७ असावा. जास्त क्षार असलेल्या जमिनीत उत्पादन कमी होते. मध्यम काळ्या जमिनीत भरपूर सेंद्रिय खते देत चांगले उत्पादन घेता येते. भारी काळ्या, चोपण, मुरमाड व हलक्या जमिनीत गड्डा नीट पोसला जात नाही. अशा जमिनी लसूण लागवडीसाठी टाळाव्यात..सुधारित जातीलसूण हे पीक शाकीय अभिवृद्धी पद्धतीने लावले जाते. या पिकात फलधारणा होऊन बी तयार होत नसल्याने, स्थानिक वाणांची लागवड प्रामुख्याने होत असे. उदा. जामनगर, महाबळेश्वर, लाडवा, मलिक, फवारी व राजेली गड्डी इ. अशा स्थानिक वाणातूनच निवड पद्धतीने अधिक उत्पादनक्षम नवीन जाती विकसित केल्या गेल्या आहेत. उदा. गोदावरी (सिलेक्शन-२), श्वेता (सिलेक्शन-१०), अॅग्रिफाउंड व्हाइट (जी-४१), यमुना सफेद (जी-५०), जी-१, जी-२, इ. जाती भारताच्या मैदानी भागाकरिता उपयुक्त आहे. ‘जी-४१’ जात जांभळा करपा व तपकिरी करपा या रोगाचा प्रादुर्भाव नसणाऱ्या क्षेत्रात चांगले उत्पादन देते. तिची साठवणक्षमताही चांगली आहे. ही जात पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर इ. भागांसाठी उपयुक्त आहे. गोदावरी ही जात जांभळ्या रंगाची आहे. जी-५० या जातीत पाकळ्यांची संख्या ३० ते ४० पर्यंत असते. कृषी विद्यापीठांनी श्वेता (पांढरी) व गोदावरी (जांभळी) या जाती विकसित केल्या आहेत. राष्ट्रीय फळबाग संशोधन आणि विकास प्रतिष्ठान संस्था व राष्ट्रीय कांदा व लसूण संस्थेने विकसित केलेले वाण पुढील प्रमाणे... .Garlic Market Rate: लसणाचे दर स्थिर; तसेच काय आहेत डाळिंब, काकडी, केळी आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव .पीडीकेव्ही पूर्णा (AKG-०७) गड्डे पांढरे, आकर्षक आणि चमकदार असून, सरासरी वजन २१ ग्रॅम असते. त्यात उच्च टीएसएस आणि अॅलिसिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही जात औषधी व पाककलेसाठी उपयुक्त ठरते. याची साठवणक्षमता जास्त असून, साठवणुकीतील नुकसान केवळ ११.१५ टक्के इतके कमी आढळते. महाराष्ट्रात रब्बी हंगामात तिचे उत्पादन सुमारे ११९.६२ क्विंटल प्रति हेक्टर इतके मिळते. मध्यम कालावधी (१३० ते १३५ दिवसांत परिपक्व होणारी) आहे. थ्रिप्स किडीस मध्यम प्रमाणात सहनशील असून, जांभळा करपा रोगास प्रतिकारक्षम आहे. त्यामुळे ही जात उत्पादन, गुणवत्ता आणि साठवण क्षमता या तिन्ही बाबतीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते..अॅग्रिफांड व्हाइट (जी-४१) गाठे टणक, पांढऱ्या रंगाचे, कळ्या मोठया आणि लांब, कळ्यांची संख्या २० ते २५ असतात. कंदाचा व्यास ३.५ ते ४ सें.मी. असतो. या जातीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. यात साखरेचे प्रमाण ४१% आणि घन पदार्थाचे प्रमाण ४२.७८ टक्के असून साठवणीसाठी उपयुक्त आहे. सरासरी उत्पादन १३० क्विंटल प्रति हेक्टर आहे. ही जात महाराष्ट्रात जेथे करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागामध्ये रब्बी हंगामासाठी शिफारशीत आहे..Garlic Price: लसणाचे भाव स्थिर; तसेच काय आहेत हरभरा, वांगी, हळद आणि उडडाचे आजचे बाजारभाव .फुले नीलिमा या सुधारित वाणाचे गड्डे आकर्षक जांभळट रंगाचे व मोठ्या आकाराचे असतात. ही जात जांभळा करपा, थ्रिप्स आणि माइट (कोळी) यांच्या प्रादुर्भावास मध्यम प्रतिकारक्षम आहे. त्यामुळे ही जात उत्पादनक्षमतेसह रोग व किडींना तुलनेने सहनशील असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. सरासरी उत्पादन १६० ते १६५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते..भीमा पर्पल या जातीचे आकर्षक जांभळ्या सालाचे व वैशिष्ट्यपूर्ण दिसणारे गड्डे बाजारात लक्ष वेधून घेतात. १२० ते १३५ दिवसांत तयार होणारी ही जात हेक्टरी ६ ते ७ टन उत्पादन देते. या जातीची लागवड दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, बिहार, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी शिफारस केलेली आहे..Farmers Rights: सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या माथी वरवंटा: राजु शेट्टी.यमुना सफेद (जी-१) गड्डे घट्ट, पांढरे, ३.५-४.५ से.मी. व्यासाचे असून, कळ्यांची संख्या २५-३० प्रति कंद असते. कळ्या ०.८ ते १० सें.मी. व्यासाच्या असून, ही जात करपा रोग आणि किडीचा प्रतिकार करते. घन पदार्थाचे प्रमाण ३९.५ टक्के असून उत्पादन १५० ते १७५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. ही जात अखिल भारतीय स्तरावर लागवडीस शिफारशी आहे. .यमुना सफेद-३ (जी-२८२) या जातीची पाने इतर जातीपेक्षा जाड रुंद असून, गड्डे आकर्षक पांढरे, मोठे, ४-६ सें.मी. व्यासाचे असून, कळ्यांचा व्यास १.२ ते १.५ सें.मी. असतो. एका गाठ्यामध्ये १५-१६ कळ्या असतात. घन पदार्थाचे प्रमाण ३९-४३ टक्के असून, मध्यम साठवण क्षमता आहे. १७५ ते २०० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देणारी ही जात निर्यातीसाठी उपयुक्त मानली जाते. संपूर्ण भारतात लागवडीसाठी शिफारशीत हे वाण महाराष्ट्रातही घेण्यास योग्य आहे..बियाणेलसणाची लागवड थेट पाकळ्या लावून केली जाते. यासाठी सुधारित वाणांचे स्वच्छ, खात्रीलायक व रोगमुक्त बेणे वापरावे. पाकळ्या वेगळ्या करताना वरचा पापुद्रा सोलला जाणार नाही किंवा कळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारण १ ते १.५ ग्रॅम वजनाच्या निरोगी पाकळ्या लागवडीसाठी योग्य मानल्या जातात. पिवळसर, पोचट किंवा बुरशीग्रस्त कळ्या लागवडीस टाळाव्यात. लहान आकाराच्या कळ्या वापरल्यास गड्ड्यांची वाढ मंदावते, काढणी उशिरा होते आणि उत्पादनात घट दिसून येते. त्यामुळे मागील हंगामातील, कोरड्या व थंड जागेत साठवलेले, पुरेशी विश्रांती मिळालेले आणि मोठ्या आकाराचे गड्डे निवडून त्यातील पाकळ्या लागवडीसाठी वापराव्यात. एका हेक्टर क्षेत्रासाठी (सुमारे २.५ एकर) कळ्यांच्या आकारानुसार ३०० ते ५०० किलो लसूण लागतो.डॉ. विजय काळे (प्राध्यापक), ८२७५३११८५४ वैभव बन्सोड (आचार्य पदवी विद्यार्थी),७५५८६५११८२(भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.