Pune News : पारंपरिक वेषभूषांनी नटलेले गणेशभक्त, ढोल ताशांचा दणदणाट...‘‘गणपती बाप्पा मोऽऽरया...पुढच्या वर्षी लवकर या...’’ अशा जयघोषात ११ दिवसांच्या देशातील आणि राज्यांतील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुदर्शीला शनिवारी (ता. ६) झाली. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाच्या विसर्जनाची सांगता रविवारी (ता. ७) सायंकाळी झाली.\.राज्यात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर यासह राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये गेल्या ११ दिवसांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा झाला. या चैतन्यदायी उत्सवाची सांगता शनिवारी झाली..पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी (ता. ६) सकाळी १० वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि ग्रामदैवत कसबा गणेशाचे पारंपरिक चांदीच्या पालखीमधील गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते..Ganesh Visarjan Mantra : गणेश विसर्जन करताना म्हणा 'हा' मंत्र.या वेळी ‘‘मोऽऽरया...मोऽऽरया...मोऽऽरया... गणपती बाप्पा मोऽऽरया...पुढच्या वर्षी लवकर या...’’ असा जयघोष भक्तांनी केला. तर मिरवणुकीत सनई-चौघडा, नगारा वादनासह शंखनाद आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात लक्ष्मी रस्त्याने मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यामध्ये मानाचा दुसरा ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी, तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळ, चौथा तुळशीबाग मंडळ आणि पाचवा केसरीवाडा गणपती मंडळाचा समावेश होता. .यानंतर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाचे सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात आगमन झाले आणि भाविकांनी जल्लोष केला अन् आणि मिरवणुकीचा उत्साह वाढला. सायंकाळी मानाच्या पाच गणेशांचे भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. तर इतर मंडळांच्या गणेशाचे विसर्जन रविवारी सायंकाळी झाले..Ganesh Festival : गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहो यासाठी काय कराल?.पुण्यासह मुंबईमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुंबईच्या गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला शनिवारी दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आधुनिक तराफा पहिल्यांदा वापरण्यात आला. .मात्र समुद्राला भरती असल्याने लालबाग राजाची मूर्ती तराफ्यावर चढविण्यात अडचणी येत असल्याने या वेळी विसर्जन काही काळ थांबविण्यात आले होते. भरती कमी झाल्यानंतर रविवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर येथेही उत्साह कायम होता. मोठ्या उत्साहात गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.