Sindhudurg News: सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. माटवी सजविण्याच्या खरेदीकरिता ग्राहकांकडून झुंबड उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान या साहित्यामध्ये दरवर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्के सुधारणा दिसून येत आहे. .गणेशोत्सवाकरीता ३ लाखांहून अधिक गणेशभक्त दाखल झाले आहेत. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची गणेशभक्तांना आस लागली आहे. बुधवारी (ता. २७) जिल्ह्यातील ७२ हजार ७५५ घरांमध्ये गणपती मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे..Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात खासदारांच्या घरी कांद्याचा देखावा.कोकणातील हा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवाकरिता आतापर्यंत तीन लाख गणेशभक्त मुंबई, पुणेसह विविध शहरांतून दाखल झाले आहेत. गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. खरेदीकरिता बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे..Ganeshotsav 2024 : राज्यात हर्षोल्हासात श्रींचे आगमन .आज सायकांळी उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी राहण्याची शक्यता आहे. नैसर्गिक साहित्यासह रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या माळा, मुखवटे, मखर आदी सजावटीचे साहित्य सर्वत्र दिसून येत आहे. .माटवी नैसर्गिक पद्धतीने सजविली जाते. कवंडळ, कागंण्या, शेरवड, हरणे, तेरडा अशी रानफुले आणि फळे खरेदी करण्यात येत होती. तालुक्यासह गगनबावडा तालुक्यातून देखील विक्रीसाठी लोक आले होते. भाजीपाला, दुधाच्या मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.