Kharif Farming Progress: खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव परिसरात गेल्या १५ दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. परिसरातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, मागील दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला आहे..सततच्या पावसामुळे काही दिवस शेतात जाणेही अवघड झाले होते. मात्र, हवामानात सुधारणा होताच शेतकरी पुन्हा शेतात उतरले आहेत. मका पिकात डवरणी, तणनियंत्रण तसेच इतर आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत..Kharif Sowing in Marathwada: कुठे पावसाची, तर कुठे वाफशाची प्रतीक्षा.कपाशी व तूर पिकांची ज्या ठिकाणी उगवण झाली नाही, त्या ठिकाणी 'बाद' लावण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे..Kharif Sowing: पुणे जिल्ह्यात १२ टक्के पेरण्या.दरम्यान, सोयाबीन पिकाची उगवणही समाधानकारक झाली असून शेतकरी पिकांच्या वाढीनुसार आवश्यक मशागतीची कामे करत आहेत. पुरेसा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा टिकून असून खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. .पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिल्यास मका, सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांची वाढ अधिक जोमाने होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतकरी शेतात राबत असल्याचे चित्र गल्लेबोरगाव परिसरात पाहायला मिळत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.