Pune News : देशात पाण्याची कमी नाही, मात्र योग्य नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय होत आहे. शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण पाणी हे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे शास्त्रोक्त झाल्यास शेतीला मुबलक पाणी मिळेल. तसेच शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा दाता आणि आता हायड्रोजन दाता बनेल, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली..नाम फाउंडेशनच्या १० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १४) मंत्री श्री. गडकरी बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंधारण विभागाचे सचिव नितीन खाडे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, विश्वस्त मकरंद अनासपुरे, चंद्रशेखर फणसळकर, एल. एस. चंद्रशेखर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..मंत्री श्री. गडकरी म्हणाले, ‘‘राज्यात पाण्याची मुबलकता आहे. मात्र जलसंधारण आणि सिंचन सुविधांअभावी शेतीच्या पाण्याच्या समस्या आहेत. विदर्भात ही समस्या अधिक असून, कापसाचे मुख्य क्षेत्र आता कमी होऊ लागले आहे. तर कापसाचे दर अनिश्चिततेमुळे कर्जाचे डोंगर वाढत आहेत. या बोजाखाली शेतकरी आत्महत्या करत आहेत. विदर्भातील ही समस्या आता मराठवाड्यात पोहोचली आहे..Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न .प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाशिवाय शेतीमालाला दर मिळणार नाही. यासाठी विविध शेतीमालापासून इथेनॉल निर्मितीला चालना केंद्र सरकार देत आहे. यामध्ये मका पिकाचा मोठा समावेश आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मिती वाढू लागल्याने आता मक्याचे उत्पन्न तीन पटींनी वाढून देखील दर वाढत आहेत. यामुळे शेतकरी आता वर्षातून मक्याची तीन तीन पिके घेत आहेत. मक्यापासून इंधन (इथेनॉल) निर्मिती आणि त्यातून ऊर्जा निर्मिती करणारा शेतकरी आता हायड्रोजन निर्मितीतून दाता होणार आहे.’’.राज्यातील गावागावात जलसाठे होण्यासाठी महामार्ग बांधणी करताना, लागणारा मुरूम, माती दगडांची रॉयल्टी आता सरकारला न देता, त्या बदल्यात मोठे तलाव बांधण्याची योजना सुरू आहे. या तलाव बांधणीतून गावशिवारांमध्ये जलसाठे होणार असून, यातून जलसंवर्धनाची कामे होणार आहे. यामुळे शेतीला मुबलक पाणी देण्याची आमचे प्रयत्न असल्याचेही मंत्री श्री. गडकरी म्हणाले..चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘सामाजिक संस्था आणि सरकारद्वारे मोठी साखळी निर्माण करण्याची गरज आहे. या साखळीद्वारे सरकारच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी नाम सारख्या संस्थांची गरज आहे.’’ प्रास्ताविक मकरंद अनासपुरे यांनी केले. या वेळी विविध उद्योग समूहांचा सामाजिक दायित्व निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला..Water Conservation : जलसमृद्ध औसा अभियानाला शिरपूर पॅटर्नचे बळ.स्वामिनाथन आयोग पूर्णपणे लागू करावा ः नाना पाटेकरस्वामिनाथन आयोगाची सध्या अंशतः अंमलबजावणी सुरू आहे. मात्र हा आयोग पूर्णपणे लागू करावा, अशी अपेक्षा नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. तसेच या आयोगामुळे शेतीच्या समस्या सुटण्यास आणि शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले..संवेदनशीलतेतून ‘नाम’ ची स्थापनाशेतकरी आत्महत्यांच्या घटनांमुळे संवेदनशील मन अस्वस्थ होत होती. समाजाची दुःख संवेदनशीलता निर्माण करते आणि त्यातूनच ‘नाम’ ची स्थापना झाली. ‘नाम’चे काम कौतुकास्पद आहेच. मात्र केवळ एका ‘नाम’ ची गरज नाही तर नाम सारख्या हजारो सामाजिक संस्थांची गरज आहे, असे मंत्री श्री. गडकरी म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.