Gadchiroli News: देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननावरून एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी काँग्रेसचे आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत कुणाल विकास राजगडे (वय २४, रा. निमगाव) हा मजूर जखमी झाला असून, त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास मुरूम उपसा सुरू असताना आमदार मसराम आपल्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. येथे मुरूम उत्खनन कसे काय सुरू आहे, अशी विचारणा करत त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मजुरांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या वेळी कुणालने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगत, कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. .Agriculture Work Issue : प्रचारात सहभागी मजुरांच्या कमतरतेमुळे शेतीची कामे रखडली.मात्र यावरून वाद विकोपाला गेला आणि चिडलेल्या जमावाने कुणालला काठीने व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात निवृत्त शिक्षक धनपाल मिसार यांच्यासह आमदार रामदास मसराम, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत..Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय.बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे. एका आमदारावरच थेट गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही मारहाण मुरूम उत्खननावरूनच झाली की यामागे दुसरे काही कारण आहे, हे सखोल पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल..मुरूम उत्खननाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. लोकप्रतिनिधी म्हणून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी सहकाऱ्यांसह तिथे गेलो होतो. मजुराला मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे. उलट आम्ही या बाबत विचारणा केली असता, तिथल्या लोकांनीच वाद घालून आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला.- रामदास मसराम, आमदार, आरमोरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.