Gadchiroli News: मोहफुलापासून दारू बनवण्याच्या एलटीबी बिव्हरेजिसच्या प्रकल्पाची जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थगित केली आहे. .गडचिरोली जिल्हा दारूबंदी संघटना, मुक्तिपथ, गडचिरोलीतील नागरिकांनी या जनसुनावणीला तीव्र आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ही सुनावणी स्थगित करावी लागली आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीत मोहफुलांपासून दारू बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचे या कंपनीने दोन वर्षांत केलेले दोन्ही प्रयत्न जनतेने हाणून पाडले आहेत. .Liquor Ban: दारूबंदीविरोधात महिला आक्रमक.एलटीबी बिव्हरेजिसने गडचिरोलीतील शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये मोहफुलापासून दारू बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव डिसेंबर २०२५ ला सादर केला होता. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९ मार्चला जनसुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीविरोधात गडचिरोली जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. .Maharashtra Liquor Policy: धान्यापासून विदेशी मद्य बनविण्यास परवानगी.१९९३ पासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. तसेच २०१६ पासून मुक्तिपथ हा व्यसनविरोधातील कार्यक्रम सुरू आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू बनवण्याचा प्रकल्प कशासाठी हवा, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जाऊ लागला. जिल्हा दारूबंदी संघटना आणि मुक्तिपथ यांनी यावर हरकत नोंदवली. .२०२४ मध्ये केलेल्या भूमिपूजनाला ८५,००० नागरिकांना आणि ३०० गावांनी हरकत घेतल्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याची मंजुरी रद्द केली होती. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस प्रसिद्ध करत ही जनसुनावणी स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी जाधव यांनी या पत्रात म्हटले आहे की, स्थानिक नागरिकांनी या जनसुनावणीला तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.