Illegal Fertilizer Practices:गडचिरोली जिल्ह्यात खतांच्या अनधिकृत साठेबाजीसह जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कृषी विभागाने मोठी कारवाई करत १४ केंद्रांचे परवाने निलंबित केले. तसेच सुनावणीदरम्यान नियमभंग सिद्ध झाल्याने दोन केंद्रचालकांना ताकीद देण्यात आली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही झाडाझडती मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे..जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील खत विक्रीत अनियमितता, साठेबाजी व कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून आतापर्यंत १७ प्रमुख कृषी सेवा केंद्रांची चौकशी केली. त्यापैकी १४ केंद्रांवर ठोस पुरावे आढळल्याने परवाने निलंबित करण्यात आले. .Fertilizer Shop License Suspension: नाशिक जिल्ह्यात १७ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित.दरम्यान, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा आणि आरमोरी तालुक्यांतील १५ कृषी सेवा केंद्रचालकांना नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत संबंधित केंद्रांनी खत साठवणूक, विक्री नोंदी व दर नियंत्रणाबाबत नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील एकूण १३३ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, खत साठेबाजी आणि अनियमिततेविरोधात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. .Fertilizer Shop License Suspension: चौदा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.नियमभंग आढळणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया व इतर खतांची मागणी वाढत असल्याने तालुका कृषी अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण पथकांकडून थेट शेतात जाऊन तपासणी केली जात आहे. त्यामुळे खतांचा गैरवापर व काळाबाजार रोखण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील खत विक्री व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..शेतकरीही चौकशीच्या कक्षेतखत खरेदी नोंदींच्या आधारे काही शेतकऱ्यांकडून अत्याधिक प्रमाणात खत खरेदी झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करून खत वापराची पडताळणी करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार अशा प्रकरणांमध्येही कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.