Palghar News : डहाणू, तलासरी परिसरात चिकू फळावर बुरशीजन्य रोगाने थैमान घातले आहे. गुजरातमधील नवसारी येथील कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनी डहाणू, तलासरी भागातील चिकू बागांची पाहणी केली. तलासरीतील ब्राह्मण पाडा, बोरीगाव, झाई आणि डहाणूतील घोलवड, राई, कसारा, झारली, रामपूर या भागातील नुकसानग्रस्त बागांचा बुधवारी (ता. १७) दौरा केला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहून शास्त्रज्ञही हवालदिल झाले..आयसीएआर निर्देशानुसार, नवसारी कृषी विद्यापीठाने त्यांच्या कृषी विद्यालय आणि फळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची समिती चिकूवरील बुरशीजन्य रोगाच्या बाबतीत अडचणी सोडविण्यासाठी पाठवली होती. शास्त्रज्ञांची समितीने भेट दिलेल्या आठपैकी सात वाड्यांमध्ये फायटोप्थेरा पाल्मीव्होरा आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला. बुरशीजन्य रोगांमुळे बागेत गळून पडलेल्या फळांचा ढीग पाहून समितीने चिंता व्यक्त केली..Chiku Crop Pest : पालघरमध्ये चिकू बागेत बी पोखरणाऱ्या अळीची भीती .बोरीगाव येथील सभागृहात झालेल्या चर्चासत्रात परिसरातील सुशिक्षित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नवसारी येथील कृषी विद्यापीठातील फळशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. तांडेल, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पी. आर. पटेल, डॉ. ए. पी. पटेल, फळ संशोधन केंद्र कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. के. डी. बिसाने यांनी शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या. .भूगर्भातील पाण्याची क्षारता जास्त असलेल्या चिकू बागायतीमध्ये, तसेच उन्हाळ्यात पाण्याची ओढ दिलेल्या बागेत फायटोप्थाेरा आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, असे पाहणीदरम्यान आढळून आले.कृषी शास्त्रज्ञांनी झाडाची पाने, फळे, फुले, मुळे, मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर एकात्मिक पद्धतीने प्रभावी रोग नियंत्रण ठेवण्यासाठीचे खते आणि रोगनाशके यांच्या वापराबाबतचे वेळापत्रक देण्यात येणार आहे..Chiku Gardener : पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना लवकरच भरपाई.अधिकारी फळबागेत उतरलेऑगस्ट, सप्टेंबरमधील मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील चिकू बागा झोडपून काढल्या आहेत. किनारपट्टी भागात बुरशीजन्य रोगामुळे चिकू फळ पिकाचे नुकसान झाले. वर्षभर केलेल्या बागायतदारांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे, असे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या बातमीची प्रशासनाने दखल घेत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसह डहाणू कृषी विभागातील अधिकारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज (ता. १८) फळबागेत उतरले..हिवाळी हंगामासाठी फुल आणि छोटी फळे गळून पडली आहेत. चिकू बागेतील फायटोपथोरा फळगळ रोगाची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांनी संयुक्त पाहणी केली. या पथकामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उत्तम सहाणे आणि कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, जगदीश पाटील आणि किशोरी विशे यांचा समावेश होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.