Ahilyanagar News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे व स्वराज्याचे प्रतीक असलेले महाराष्ट्रातील गड-कोट व किल्ले आज दुर्दशेत आहेत. या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने तातडीने भरीव निधी द्यावा, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेत केली. .तसेच, पुणे-अहिल्यानगर इंटरसिटी एक्स्प्रेस लवकर सुरू करावी, अहिल्यानगर-चौंडी नवीन रेल्वेमार्ग, संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे नवीन रेल्वेलाइन, श्रीरामपूर-परळी, वैजनाथ नवीन रेल्वेमार्ग या चार प्रकल्पांचे सर्व्हेक्षण, डीपीआर, मंजुरी प्रक्रियेची सद्यःस्थिती याविषयी माहिती देण्याची व त्वरित कार्यवाही करण्याची विनंती लंके यांनी लोकसभेत केली..Mineral Development Fund: दोन कोटी रुपयांचे निविष्ठा प्रकरण गाजणार विधिमंडळात .लोकसभेत प्रश्न उपस्थित करताना लंके म्हणाले, ‘‘छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी उभारलेले गड-कोट हे आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. पण आज ते जीर्ण अवस्थेत आहेत. किल्ल्यांवरील प्राचीन मंदिरे कोलमडली आहेत, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधाही नाहीत. हे पाहवत नाही.’’.Fort Conservation: गड संवर्धन मोहिमा जगण्याला देतात बळ.ते पुढे म्हणाले, ‘‘ गड-किल्ल्यांचे संवर्धन हा फक्त महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अमर वारशाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी आणि संरक्षण, दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे.’’ त्यांच्या या मागणीला अन्य सदस्यांनी पाठिंबा दिला..तसेच, राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे लाइनसाठी भूसंपादन प्रक्रिया त्वरेने सुरू करावी, अहिल्यानगर स्थानकाजवळील लेव्हल क्रॉसिंग क्र. ३० येथे रोड ओव्हर ब्रिज (आरओबी), तसेच राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे गेट क्र. ३५(ब) येथील मंजूर आरओबीचे काम लवकर सुरू करावे, अशीही मागणी त्यांनी केली. ‘‘मतदारसंघाच्या विकासाला रेल्वे प्रकल्पांची साथ अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रलंबित बाबींवर तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी लावावीत,’’ असे त्यांनी याबाबत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना पत्र दिल्याचे लंके म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.