Pune News: कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्याच्या नावाखाली वाजतगाजत आणलेल्या कृषी समृद्धी योजनेचे नियोजन अतिशय दुबळे ठरले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार महिने बाकी असताना योजनेसाठी निधी मिळालेला नाही. निधीच्या अपेक्षेने राज्यभर वाटलेल्या पूर्वसंमतिपत्रांचे पुढे काय होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे..कृषी आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की जुन्या योजनांकरिता ‘कृषी समृद्धी’साठी भरपूर वाढीव निधी मिळेल, असे प्रशासनाने गृहीत धरले होते. त्यातून विविध योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदानाची हमी देणारी पूर्वसंमतिपत्रे राज्यभर वाटली गेली. परंतु, प्रत्यक्षात निधी मिळत नसल्याने संबंधित योजनांचे अंमलबजावणी अधिकारी आता हैराण झाले आहेत..Krushi Samruddhi Yojana: अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी.वैयक्तिक तसेच सामुहिक घटकांच्या जुन्या योजनांसाठी यंदा तुम्हाला चार हजार कोटी रुपये मिळतील. तसेच, जिल्हानिहाय योजनांसाठी ५०० कोटी रुपये; तर कृषी संशोधन व मोठ्या गुंतवणुकीच्या योजनांसाठी ५०० कोटी रुपये दिले जातील, असे मंत्रालयातून आम्हाला सांगण्यात आले. या निधीचे जिल्हा व विभागनिहाय वाटपदेखील शासनाने ठरवून दिलेले आहे. परंतु, एकाही घटकासाठी निधी दिला गेलेला नाही. पान ४ वर.Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही.कृषी समृद्धी योजनेतून यंदा पुरेसा निधी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिलेले आहे. परंतु, वेळेत निधी न पाठविल्यामुळे आता पूर्वसंमतिपत्रांचे वाटप थांबवावे किंवा कसे, असादेखील मुद्दा उपस्थित झालेला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘कृषी समृद्धी’च्या नावाखाली थेट कोणत्याही विभागाने संमतिपत्रे वाटलेली नाहीत. .या योजनेमधून जुन्या योजनांसाठी निधी मिळेल, असे अपेक्षित ठेवून जादा संमतिपत्रे वाटली ही वस्तुस्थिती आहे. ‘‘मुख्यत्वे एकात्मिक फलोत्पादन अभियान, ठिबक, यांत्रिकीकरण अशा मोठ्या विभागांचा समावेश आहे. संमतिपत्रे मिळालेले शेतकरी आता सामग्री खरेदी करीत आहेत. त्यांची बिले सादर होताच ते अनुदानासाठी तगादा लावतील. अनुदान मुदतीत वाटले न गेल्यास समस्या वाढतील,’’ अशी भीती या अधिकाऱ्याने व्यक्त केली. दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशनात ‘कृषी समृद्धी’चा मुद्दा मांडून पुरवणी मागण्यांद्वारे निधी मिळण्यासाठी पाठपुरावा चालू झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.