Yavatmal News: गत वर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे तब्बल चार कोटी ८० लाख रुपयांचे देयके पाणीपुरवठा विभागात पडून आहे. मात्र, अद्यापही निधी प्राप्त झाला नाही. निधी मागणीचा प्रस्ताव आयुक्तांसह शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे. पावसाळाच नव्हे, तर चक्क हिवाळा लागला असला, तरीसुद्धा देयके न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसह कंत्राटदारांच्या चकरा पाणीपुरवठा विभागात सुरू झाल्या आहेत..जिल्ह्यात २०२४-२५ करिता ४१६ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चार कोटी ८० लाख ६२ हजार रुपयांच्या पाणीटंचाईचा संभाव्य कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर उन्हाळ्यात पुसद, आर्णी, यवतमाळ, दारव्हा, झरीजामणी, घाटंजी, उमरखेड, बाभूळगाव, दिग्रस, कळंब, वणी, नेर, आदी तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागली..Development Fund Crisis: आमदारांना निधी मिळेना! ९ महिन्यांपासून राज्यात विकासकामे ठप्प.या तालुक्यातील ५० गावांमध्ये एकूण ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर २६६ गावांमध्ये ४३ बोअरवेल आणि २५३ खासगी विहीर, अशा मिळून २९६ उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे तात्पुरती पूरक नळ योजना, नळ योजना विशेष दुरुस्ती या उपाययोजनासुद्धा प्रस्तावित केल्या होत्या..ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांसह टँकर, खासगी विहीर अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांचे चार कोटी ८० लाख रुपयांची देयके रखडली आहेत. उन्हाळ्यात केलेल्या योजनांचा निधी हिवाळ्यात मिळणे अपेक्षित आहे. .Cow Funding Crisis : राज्यमाता गाईंच्या परिपोषणाचा कोट्यवधींचा निधी थकित .मात्र, डिसेंबर महिना उजाडला. आता नवीन टंचाईचा कृती आराखडा बनविण्याच्या कामांना सुरवात झाली आहे. तरी शासनाने टंचाईची दमडीही उपलब्ध करून दिली नाही..संभाव्य कृती आराखड्याचे प्रस्ताव बोलाविलेउन्हाळ्यात दरवर्षी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्यापासूनच उपाययोजनांचे नियोजन करण्यात येते. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे, असे पत्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सोळाही पंचायत समिती गटविकास अधिकऱ्यांना पाठविले आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही पंचायत समितीतून प्रस्ताव प्राप्त झाले नाही. तर ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत टंचाई निरंक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.