Impact of Fuel Crisis: ग्रामीण भागात डिझेल व पेट्रोलटंचाईच्या अफवेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इंधन संपण्याच्या भीतीने राज्याच्या विविध भागांत पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर रांगा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक ठिकाणी प्रशासनाकडून प्रति वाहन केवळ दोन हजार रुपयांपर्यंत डिझेल देण्याची मर्यादा घालण्यात आल्याने शेतीकामांवर याचा थेट परिणाम होत आहे..सध्या ग्रामीण भागात गहू, हळद यांसारखी रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर आली आहेत. मात्र हार्वेस्टर चालविण्यासाठी आवश्यक असलेले डिझेल अपुरे पडत असल्याने काढणीला विलंब होत आहे. ‘‘दोन हजार रुपयांच्या डिझेलमध्ये हार्वेस्टर किती वेळ चालणार?’’ असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत..Nashik Fuel Stock: नाशिक जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका.परिणामी, काढणी उशिरा होत असून, उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही शेतकरी पुढील हंगामासाठी शेतजमीन तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने नांगरणी, वखरणी यांसारखी प्राथमिक कामेही ठप्प झाली आहेत. यामुळे केवळ चालू हंगामच नव्हे, तर आगामी खरीप हंगामावरही या परिस्थितीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे..यासोबतच बदलते हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. काढणी उशिरा झाल्यास शेतात उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते. यंत्रसामग्रीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला असून आर्थिक व मानसिक ताण वाढत आहे..शेतकरी वर्गाने शासन व प्रशासनाकडे तातडीने डिझेल पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे. विशेषतः हार्वेस्टर, ट्रॅक्टर यांसारख्या शेती यंत्रणांसाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा शेतीचक्र विस्कळीत होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे..Fuel Shortage Rumors: कॅन, डब्यात पेट्रोल दिल्यास गुन्हा दाखल होणार.मर्यादित साठा, वाढती गरजप्रशासनाने सर्वांना इंधन उपलब्ध व्हावे यासाठी मर्यादित पुरवठ्याचे नियम लागू केले असले, तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी चारचाकी व ट्रॅक्टरमध्ये वारंवार साठेबाजी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरजूंना डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिसरात अजूनही सुमारे ३० टक्के गव्हाची काढणी बाकी असून, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात डिझेल मिळावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे..अनेक ठिकाणी पंपांवर रांगाडिझेलच्या वितरणावर अनेक ठिकाणी मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, ती काही जिल्ह्यांत ठिकाणी मागे घेण्यात आली आहे. परंतु नेमक्या किती जिल्ह्यांमध्ये निर्बंध असल्याचे कळू शकले नाही. टंचाईच्या भीतीमुळे अनेक ठिकाणी पंपांवर रांगा लागत असल्याचे चित्र आहे. सरकारकडून पेट्रोल, डिझेलची टंचाई नसल्याचे सांगितले जात असूनही अफवा पसरत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे..सध्या पिकाच्या काढणी मळणी सोबतच येत्या खरिपातील मशागतीची कामे देखील सुरू झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने शेती कामासाठी डिझेलची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे. यासाठी कोणतीही मर्यादा असू नये.जगदीश नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते, महागाव.मोठ्या कॅन किंवा बॉटलमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थ देण्याची तरतूद नाही. वाहनात जेवढे बसेल तेवढेच पेट्रोल, डिझेल देण्यात यावे, असा नियम आहे. परंतु ग्रामीण भागात ट्रॅक्टर किंवा जेसीबी धारक मोठ्या कॅन किंवा टाकीमध्ये पेट्रोल डिझेलची साठवणूक करतात. परंतु हे कायदेशीर नाही. सध्या अपवादात्मक स्थितीत वाहनात बसेल इतकं पेट्रोल, डिझेल देण्याची तरतूद आहे, निर्बंध नाहीत अशी आमची माहिती आहे.गौरव जयस्वाल, अध्यक्ष, नागपूर पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.