Kharif Tillage Delay: मॉन्सूनपूर्व मशागतीची लगबग सुरू असतानाच जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने आणि काही ठिकाणी कॅनमधून केवळ मर्यादित स्वरूपात इंधन दिले जात असल्याने जिल्ह्यातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत आहे..सध्या जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शेतजमीन तयार करणे, नांगरणी, कुळवणी आणि ढेकळे फोडण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र डिझेलच मिळत नसल्याने लाखो रुपयांचे ट्रॅक्टर शेतातच उभे आहेत. इंधनाअभावी मशागत रखडल्यास मॉन्सूनचा पाऊस वेळेवर आल्यावर पेरण्या कशा करायच्या? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत..Fuel Price Hike: इंधन दरवाढीमुळे शेती मशागतीचे दर वाढले.ग्रामीण भागातील पंपांवर डिझेल संपल्याचे फलक झळकत आहेत, तर काही ठिकाणी अत्यंत अपुऱ्या प्रमाणात इंधन उपलब्ध आहे. ट्रॅक्टरचालक जेव्हा ट्रॅक्टरसाठी कॅन घेऊन डिझेल आणायला जात आहेत, तेव्हा त्यांना ठरावीक मर्यादेतच केवळ ५ ते १० लिटर डिझेल दिले जात आहे. ट्रॅक्टर चालवण्यासाठी दिवसाला ५० ते ६० लिटर डिझेलची आवश्यकता असताना,.या मर्यादित पुरवठ्यामुळे काम कसे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आणि पेट्रोल पंप असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण ३१६ पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्याला नियमितपणे दररोज ४० ते ४५ टँकर इंधनाचा पुरवठा केला जातो. मागणी-पुरवठ्यातील विसंगतीमुळे डिझेल टंचाई निर्माण होत आहे..Fuel Shortage: छत्रपती संभाजीनगरात इंधन तुटवड्याने शेती मशागतीचा खोळंबा.प्रशासनाकडून स्पष्टोक्ती नाहीसध्या ग्रामीण भागात ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात इंधन लागत असले तरी तो पुरवठ्याचा पुरवठा होत नसल्याने कामे थांबत आहेत. नियम सर्वांना सारखेच असल्याने आम्ही शेतीकामासाठी विशेष जादा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे प्रशासनातून देण्यात आली. यामुळे ट्रॅक्टर चालकच शेतकऱ्यांना तुम्हाला डिझेल मिळत असेल तर घेऊन या लगेच मशागतीस येतो अशी विनंती करताना दिसत आहेत..एकीकडे खतं, बियाणं महाग झालीत आणि दुसरीकडे आता ऐन गरजेच्या वेळी डिझेल मिळेना झाले आहे. ट्रॅक्टरने नांगरणी करायची म्हणून डिझेलसाठी वणवण करावी लागतेय. शेतीची कामे काय कंपन्यांच्या नियमांवर थांबणार आहेत का? प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन शेतीसाठी डिझेलचा कोटा राखीव ठेवला पाहिजे, नाहीतर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मारुती पाटील, वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.आमचा हक्काचा रोजगार बुडतोय. वर्षभर आम्ही या दिवसांची वाट बघतो. लाखो रुपयांचे कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलाय, त्याचे हप्ते भरायचे कसे? दिवसाला मशागतीसाठी कमीत कमी ५० ते ६० लिटर डिझेल लागतं. पंपावर गेल्यावर ‘कॅनमध्ये डिझेल देणार नाही’ किंवा ‘मर्यादितच मिळेल’ असे नियम सांगितले जातात. मग आम्ही ट्रॅक्टर घरात शोभेसाठी उभा करायचा का? इंधनाअभावी आमची चाकं थांबली आहेत.सचिन चौगुले, ट्रॅक्टर व्यावसायिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.