Solapur News : अतिवृष्टीच्या पावसाने तालुक्यातील बागायत क्षेत्रासह फळबागायतदार शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असतानाच फळ पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा केली जात असल्याचा प्रकार घडला आहे. .द्राक्ष बागेच्या विम्यासाठी १५ हजार २०० रुपयांचा विमा भरला होता. मात्र विमा कंपनीकडून केवळ ५९९४ रुपये देण्यात आले आहे. निसर्गाने अवकृपा केलेली असतानाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा अशा प्रकारे चेष्टा केली जात आहे..याबाबत विमा कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गतवर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे शिवाय व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शंभर एकराहून अधिक शेतकऱ्यांना द्राक्षे बांधावर फेकून देण्याची वेळ आली. .Crop Insurance Compensation : सिंधुदुर्गमधील आंबा, काजू बागायतदारांना दिवाळीपूर्वी फळपीक विमा परतावा .त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर केलेला खर्च वाया जाऊन एक रुपया देखील उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले नाही तो तोटा सहन करून गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळ पीक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेल्या २ एकर द्राक्ष पिकाचा विमा १५ हजार २०० रुपये इतका विमा कंपनीकडे भरला..विमा प्रस्ताव दाखल करताना संबंधित गटाचे उतारे, बँक पासबुक, आधार झेरॉक्स, जिओ टॅग केलेला फोटो आदीसाठीचा देखील खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. परंतु विमा कंपनीने नुकसान भरपाई देताना चक्क ५,९९४ रुपये भरपाई मंजूर करून शेतकऱ्याची थट्टा केली आहे. तालुक्यातील इतर मंडलामध्ये देखील ही भरपाई प्रमाणात दिली आहे. .Fruit Crop Insurance: वर्धा, नागपूर जिल्ह्यांसाठी फळपीक विमा योजनेला सुरुवात .उलट शेतकऱ्याच्या भरलेल्या हप्त्यातून ४० टक्के भरपाई उर्वरित ६० टक्के रक्कम विमा कंपनीकडे स्वतःकडे ठेवल्याने विमा कंपनीचा कारभारच शेतकऱ्याने भरलेल्या हप्त्यावर सुरू असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत..बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे २०१८ साली भरलेल्या रब्बी हंगामातील मंजूर पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने अजून दिले नाही. यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला ना शासनाचे अधिकारी देखील याकडे लक्ष देत नाहीत. सध्या वयोवृद्ध असल्यामुळे कृषी कार्यालयास हेलपाटे मारून थकले आहे.- फुलाबाई भुसनर, शेतकरी, जालिहाळ.एका बाजूला निसर्ग शेतकऱ्यावर अन्याय करत आहे. दुसऱ्या बाजूला शासन मदतीच्या नावाखाली नुसते कागदी घोडे नाचवत आहे आणि विमा कंपनी शेतकऱ्याचा खिसा कापण्याचे काम करत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न या निमित्ताने आता समोर उभा राहू लागला. - आमसिद्ध केदार, द्राक्ष बागायतदार शेतकरी, डोणज.विमा कंपनी व राज्यकर्त्यांच्या साटेलोट्यात शेतकरी भरडला जात आहे. पीक नुकसान आणि भरलेल्या हप्त्यापेक्षा कमी भरपाई दिलेल्या विमा कंपनीवर शासनाने कारवाई न केल्यास या कारवाईसाठी स्वाभिमानीकडून आंदोलन केले जाईल.- युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.