Raju Shetty : एकरकमी ‘एफआरपी’ आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या

महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला राहिले आहे.
Raju Shetty
Raju ShettyAgrowon

Kolhapur News : केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी प्रश्‍नांवर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. वीजतोडणी, ऊसतोडणी मुकादमाकडून होणारी फसवणूक थांबवावी, एकरकमी एफआरपी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, किमान हमीभावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, पीकविमा तातडीने खात्यावर जमा करा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दिले पाहिजे.

आदी निर्णय झाले नाहीत तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांनी सरकारला दिला.

उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या चेकनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. २२) साडेअकराच्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी श्री. शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला.

Raju Shetty
Raju Shetty : ‘स्वाभिमानी’चा बुधवारी राज्यव्यापी ‘चक्का जाम : राजू शेट्टी

शेट्टी पुढे म्हणाले, की महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला राहिले आहे. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्‍न पडलाय.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला तुटपुंजी मदत जाहीर केली आणि तीही वेळेवर मिळत नाही. पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या. हजारो कोटींचा नफा मिळवला आणि ज्या शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांना मात्र उन्हातान्हात उभी राहण्याची वेळ आली आहे.

या वेळी सावकार मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, सागर शंभूशेट्टे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com