Rural Development: वक्तृत्वाला झाला ‘मनरेगा’ परिसाचा स्पर्श
MGNREGA: नुसतेच बोलणाऱ्या माणसाला कुणीही ‘‘काय तोंडच्या वाफा दवडतोयस?’’ असं म्हणून गप्प करू शकतो. पण आपल्या बोलण्याने वक्तृत्वाने ग्रामीण भागात पाण्याचे अंदाजपत्रक, जलसंधारणाची कामे यांचा प्रसार करणारे रवींद्र इंगोले हे अजबच रसायन.