सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील भूपाल सत्याप्पा झिणगे यांनी ऊस, हळद, द्राक्षे यांसारख्या व्यावसायिक पिकांमध्ये यश मिळवले. प्रयोगशील वृत्ती, अभ्यासूवृत्ती, नव्या पिकांचा ध्यास ही वैशिष्ट्ये त्यांनी कायम जपली. म्हणूनच ऊस पट्ट्यात सुपारी व त्यात कॉफीचा प्रयोग करण्याचे धाडस १९९८ मध्ये केले. सत्तावीस वर्षांच्या जोपासनेतून सुपारीसह कॉफीचे पीकही यशस्वी केले. कर्नाटकात हुकमी बाजारपेठही मिळविली. आज या कॉफीचा यशरूपी सुगंध, स्वाद सर्वदूर पसरलेला दिसून येतो. .सांगली जिल्ह्यात सांगली-इस्लामपूर राज्य मार्गावर वसलेले आष्टा (ता. वाळवा) हे गाव ऊस, हळद आणि केळी या पिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीत जन्मलेले भूपाल सत्याप्पा झिणगे वयाच्या ६९ व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल या तडफेने शेतीत रमलेले पाहायला मिळतात. सन १९७८ मध्ये जुन्या काळातील एसएससी ते उत्तीर्ण झाले आहेत. कृषी शिक्षणासाठी त्यांना प्रवेशही मिळाला होता. पण घरच्या शेतीत वेगळं काही घडविण्याचं स्वप्न होतं. त्यामुळं फार वेळ न दवडता त्यांनी घरच्या शेतीत प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली. .Success Story: पूरक उद्योगातून सक्षम झाल्या महिला .त्या काळात झिणगे कुटुंब एकत्र राहात होतं. तीन भावांची मिळून सुमारे ४८ एकर कोरडवाहू शेती होती. पैकी जयपाल पुढे शिक्षक झाले, तर भूपाल आणि कै. बळवंत यांनी शेतीचा विकास करण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली. कोरडवाहू शेतीला बागायतीचं स्वरूप दिलं. जमिनीला पाणी मिळालं आणि मेहनतीला फळ आलं द्राक्ष, ऊस, हळद अशी पिकं बहरू लागली. या पिकांमध्ये भूपाल यांनी आपला ठसा उमटवला. गावात त्या वेळी द्राक्ष बागांचा विस्तार व्हायला सुरुवात झाली होती. भूपाल मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन वेगळ्या पिकांच्या शोधात होते. .सुपारी, कॉफीची मिळाली दिशा दरवर्षी एकदा तरी भूपाल आणि त्यांचे मित्रमंडळी रोजच्या शेतीचं ओझं बाजूला ठेवून भ्रमंतीला निघायचे. तो छंदच त्यांना जडलेला होता. एकदा अशीच एक सहल त्यांनी कर्नाटक राज्यातील उडपी तसेच डोंगररांगांमध्ये अनुभवली. त्या वेळी सुपारीच्या बागा पाहण्यात आल्या. या पिकाविषयी उत्सुकता निर्माण झाली. हे पीक आपल्या मातीत येऊ शकेल का, असा विचार वारंवार मनात येऊ लागला. ज्ञानाची तहान दिवसेंदिवस वाढतच गेली. १९९४ साल होतं. ऊस, हळदीत हातखंडा मिळविलेले भूपाल यांनी अशात एक मोठा निर्णय घेतला सुपारीची लागवड करायचीच..Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन.कर्नाटक राज्यातील मडिकेरी भाग हा सुपारीसह कॉफी लागवडीसाठीही प्रसिद्ध आहे. तिथं सुपारीच्या बागेत लावलेली कॉफीही मनात भरली. हे पीक तर आपल्या भागासाठी फारच नवं होतं. मग या आंतरपिकांचं नियोजन कसं केलं जातं याबाबतचे सगळे बारकावेही टिपले. सुपारीच्या बागेत कॉफी घेतल्यास फार खर्च येत नाही. या पिकाला पन्नास टक्के सावली तर पन्नास टक्के ऊन असे वातावरण लागते. कॉफीला माळरान, निचरा होणारी जमीन अनुकूल ठरते या बाबी तेथील शेती पाहिल्यावर लक्षात आल्या. सुरुवातीला सुपारीच्या १२०० झाडांची लागवड झाली. त्याच्या व्यवस्थापनातही कुशलता मिळू लागली. .कॉफीचा प्रयोग सुपारीची बाग यशस्वी झाली. दरम्यान, शेतीच्या वाटण्या झाल्या. भूपाल यांच्या वाट्याला १५ एकर शेती आली. त्यात सुपारीची सुमारे ६५० झाडे होती. त्यात कॉफीची लागवड करण्याचे नियोजन झाले. मडिकेरी भागातूनच रोबस्टा आणि अरेबिका या दोन जातींच्या मिळून सुमारे ७०० रोपांची खरेदी प्रति रोप १० रुपये दराने (वाहतूक खर्च वगळून) झाली. ही गोष्ट साधारण १९९८ ची. नऊ बाय नऊ फूट अंतरावर लागवड केलेल्या सुपारीच्या दोन झाडांमध्ये कॉफीची लागवड झाली. इथल्या वातावरणात रोपं रुजणार का अशी भीती मनात होती..Farmer Success Story : भाताला भाज्या-केळीची जोड शेतीचे अर्थकारण झाले गोड .कॉफीचं उत्पादन सुरू व्हायला चार वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यानुसार २००२ मध्ये पहिलं उत्पादन हाती आलं. आणि ऊसपट्ट्यात आपण कॉफी पिकवली या भूपाल यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आजमितीला सुपारीची एकूण ३६०० झाडे आहेत. तर कॉफीची जुनी व नवी मिळून सुमारे सातशेच्या दरम्यान झाडे आहेत. मध्यंतरी २००५ व २०१९ या वर्षी कृष्णा नदीला आलेल्या महापुरात जुन्या सुमारे २५० ते ३०० झाडांचे नुकसान झाले. मात्र नव्या लागवडीतून ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न कला आहे. .कॉफी व्यवस्थापनातील ठळक मुद्दे वाण- रोबस्टा, अरेबिका आणि कावेरी. फेब्रुवारी, मार्चमध्ये पीक फुलोरावस्थेत येतेसप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान काढणी सुरू होते.उत्पादनासाठी मर्यादित फांद्या ठेवल्या जातात..Agriculture Success Story: जिद्द सुनेला ‘सीए’ करण्याची.....भूपाल सांगतात, की कॉफीचे व्यवस्थापन तसे सुकर आहे. सुपारीच्या बागेत शेणखत, रासायनिक खत, पाणी आदींचे व्यवस्थापन केले जाते. त्यातच कॉफीचे व्यवस्थापन होऊन जाते. फवारण्या फारशा कराव्या लागत नाहीत. बागेत नारळ, सुपारीची सावली आहे. त्यामुळे कॉफीचे झाड चांगले रुजले आहे. कॉफी बागेत कायम गारवा ठेवावा लागतो. त्या दृष्टीने तुषार सिंचनाचा वापर केला आहे. त्यातून बागेत पन्नास टक्के सावली, पन्नास टक्के ऊन आणि गारवा असे अनुकूल वातावरण तयार झाले आहे. .काढणी व विक्रीचे नियोजन कॉफीची बी तांबड्या रंगाची झाली की ती फांदी कापून घेतली जाते. त्यानंतर या फांदीचा पीक अवशेष म्हणूनच वापर होतो. प्रत्येक वेळी नव्या फांदीला कॉफीची बी लागते. काढणी हंगाम संपल्यानंतर छाटणीही केली जाते. त्यामुळे झाडाची उंची मर्यादित राहते. उत्पादन चांगले मिळते, कॉफीच्या बी चा दर्जा आणि आकार मोठा होतो. त्यामुळे गुणवत्ता चांगली होते. वर्षातून एकदाच अंदाजे ४ ते ५ क्विंटलपर्यंत, तर प्रति झाड सरासरी ५०० ग्रॅम व कमाल ७०० ग्रॅमपर्यंत उत्पादन मिळते. कॉफीच्या बिया वाळविल्या जातात. त्यानंतरच त्या विक्रीसाठी सज्ज होतात. .Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती.मार्केट केले उपलब्ध कर्नाटकातील शिरशी हे सुपारी आणि कॉफी या दोन्ही पिकांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. झिणगे यांनी सुपारी विक्रीसाठी हीच बाजारपेठ निवडली. येथील सोसायटीचे ते भागधारक देखील झाले. त्यामुळे खरेर्दी- विक्री प्रक्रियेत मोठी सुलभता मिळाली. कॉफीचा बाजार शिरशी आणि मडिकेरी अशा दोन्हीकडे भरतो. मात्र मडिकेरीला जायचं म्हटलं तर वाहतुकीचा खर्च फारच जास्त. म्हणून झिणगे यांनी कॉफीची विक्री देखील शिरशी येथेच करण्याचे ठरवले. सुपारी विक्रीतील ओळखीमुळे ते सोपेही झाले. .नवीन वाणाचा प्रयोगकावेरी जातीच्या कॉफीलाही चांगली मागणी असल्याचे भूपाल यांच्या लक्षात आले. त्यानंतर सध्याच्या दोन वाणांच्या लागवडीसह आता तीन- चार वर्षांपूर्वी त्याच्या सुमारे २५० ते ३०० रोपांची लागवड झाली आहे. आता झाडाला फुले लागली आहेत. वर्षातून दोन वेळा या जातीपासून उत्पादन घेऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे..Farmer Success Story : व्यावसायिक वृत्ती जोपासून मिळवली समृद्धी.काळी मिरी पिकविण्याची जिद्द भूपाल यांचे गाव व शेती सांगली शहरापासून काही किलोमीटरवर आहे. सांगली शहरातील नदीच्या पाण्याने पुलाची विशिष्ट उंची गाठली की भूपाल यांच्या शेतालाही पाण्याचा प्रचंड मोठा फटका सहन करावा लागतो. अशा परिस्थितीतही भूपाल यांनी नवे प्रयोग करण्याची जिद्द काही सोडली नाही. दक्षिण कर्नाटकातील कुमठा भागात सुपारीच्या झाडावर बांधलेल्या काळी मिरीच्या वेली एकदा त्यांच्या दृष्टीस पडल्या. आपल्या शेतातही हा प्रयोग यशस्वी का ठरू नये, असे वाटून गेले. सन २००५ मध्ये कुमठा येथून तब्बल २५ रुपयांना एक अशी मिरीची हजार रोपे खरेदी केली. सुपारीच्या बागेत मोठ्या उत्साहाने ती लावली. मात्र त्याच वर्षी महापुराने रोपे वाहून गेली. डोळ्यादेखत परिश्रम वाया गेले. पण हार मानली नाही..सन २०१६ मध्ये नव्याने मिरीच्या एक हजार रोपांची लागवड केली. काटेकोर व्यवस्थापन, योग्य खत-पाणी आणि निगा राखून वेलींना रुजवले. ज्यांच्याकडून रोपे आणली होती त्यांनी पाहणीदरम्यान सांगितले, की प्रत्येक वेलीवर सरासरी दोन किलो उत्पादन मिळेल. सुपारीच्या झाडावर आठ ते नऊ फूट उंचीच्या वेली पोचल्या होत्या. काढणी आणि विक्रीचे नियोजन सुरू केले होते. पण पुन्हा नियतीने अडथळा आणला. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराने सात दिवस शेतात पाणी साचून राहिले. दुसऱ्यांदा नुकसान झाले. आज बागेत सुमारे २५ पर्यंत मिरीचे वेल टिकवले आहेत. वर्षाकाठी पाच किलोपर्यंत उत्पादन मिळते. त्यातील काही घरच्या वापरासाठी तर उर्वरित स्थानिक व्यावसायिकाला विकली जाते..Agriculture Success Story; करडईची उत्कृष्ट शेती, दर्जेदार बियाणे निर्मिती .ऊर्जा अन् उत्साह वयाच्या ६९ व्या वर्षीही भूपाल यांचा कामाचा आवाका मोठा आहे. प्रचंड इच्छाशक्ती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा कधीच जाणवत नाही. कोरोनाच्या काळात परिस्थिती गंभीर झाली होती. उपचार सुरू झाले. हळूहळू सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी जवळपास सहा महिन्यांची विश्रांती सांगितली. त्यांची र प्रत्येक सूचना पाळली, औषधोपचार नियमित घेतले. संयम ठेवला. त्यातून हळूहळू प्रकृती सुधारली. परंतु आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या जोमाने शेतीत पाऊल टाकले. ज्ञान घेण्याची आणि ते प्रत्यक्ष शेतात उतरवण्याची जिद्द या वयातही कायम असल्याचे पाहण्यास मिळते. .सुपारीच्या प्रयोगाविषयी भूपाल सांगतात, की लागवडीपूर्वी विविध वाणांची माहिती घेतली. कोकणात वेंगुर्ला, दापोली या ठिकाणी जाऊन अभ्यास केला. सन २०२१ मध्ये कर्नाटक राज्यात असलेल्या सुपारी संशोधन केंद्राला भेट दिली. तिथे विठ्ठल १, विठ्ठल २ या वाणांची माहिती मिळाली. या दोन्ही वाणांवर या केंद्राने कार्य केले आहे. तिथं काही टीप्सही मिळाल्या. ज्या पुढे उपयोगात आणल्या. त्यानुसार सुपारीच्या झाडांना पाल्याचे आच्छादन करण्यास सुरवात केली. मधुर मंगला सुपारीचे वाण आणले..Agriculture Success Story: वारकेंची तंत्रशुद्ध, बहुविध पीकपद्धती.त्याला चांगले उत्पादन मिळाले. आता दोनशे रोपांची लागवड केली आहे. अभ्यास करत असताना असे निदर्शनास आले की, प्रत्येक पानात कणीस फुटते. परंतु कोकणात अति पाऊस असतो. त्यामुळे पाणी कणसात साचल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. आमच्या इथे पावसाचे प्रमाण कमी असल्याने कणसात पाणी साचत नाही. एका झाडाला पाच कणसे येतात आणि उत्पादनही चांगले मिळते. श्रीवर्धन, मोहितनगर या दोन्ही प्रति सुपारीच्या झाडाला जातीला प्रति अडीच किलो तर सुमंगला वाणाला दोन किलो या दरम्यान उत्पादन मिळते..‘ड्रायर’चा वापर करणारसुपारी काढल्यानंतर ती वाळविव्यासाठी तीस दिवसांचा कालावधी लागतो. त्यात वेळ आणि कष्टही फार आहेत. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रायर बसविला जाणार आहे. त्यासाठी लवकरच त्याचे मोठे शेड उभारण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या ड्रायरद्वारे अवघ्या ११ दिवसांत संपूर्ण सुपारी सुकविण्याचे काम होणार असल्याचे भूपाल सांगतात. .मोहितनगर, श्रीवर्धन व सुमंगला या जाती.जानेवारी ते जून काढणी हंगाम. एकूण सर्व मिळून एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन.दर प्रति क्विंटल ४२ हजार ते ४५ हजार रुपये. अलीकडे ४७ हजार रु. .उच्चशिक्षित कुटुंब झिणगे कुटुंबातील प्रत्येकाला शिक्षणाची आवड होती. त्यातूनच भूपाल यांच्या विनय, अजय आणि अमेय या तीनही मुलांनी ‘इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले आहे. तिघेही चांगल्या ठिकाणी नोकरीत व्यस्त आहेत. दोन्ही भावांची मुले वैद्यकीय, शिक्षण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहेत. भूपाल सांगतात की वाटण्या होण्याआधीच्या काळापासून संपूर्ण कुटुंबाच्या शेतीची मुख्य जबाबदारी माझ्याकडेच होती.तेव्हापासून घेतलेल्या कष्टातून प्रकृती निरोगी व ठणठणीत झाली आहे. कोणत्याही व्याधी नाहीत. भूपाल यांना पत्नी पुष्पा यांचाही शेतीतील लहान- मोठ्या कामांमध्ये मदतीचा हात असतो.भूपाल झिणगे ७५८८५८६६८०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.