Sustainable Environment : देशासाठी सैनिक म्हणून सेवा बजावलेला एखादा सैनिक निवृत्तीनंतर काय करतो, असे विचारले तर अन्य एखादी नोकरी, शेती अशी केवळ स्वतः आणि कुटुंबाभोवतीची फिरणारी अनेक उत्तरे आपल्याला मिळू शकतात. पण निवृत्तीनंतरही देश आणि समाजासाठीच काहीतरी करायचे, याचा ध्यास घेतलेले रमेश खरमाळे हे जगावेगळेच...ते २०१२ ला सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर २०१२ ते २०२५ या बारा वर्षांत त्यांनी पाणी व निसर्गविषयक कामगिरीच आपण डोळ्याखालून घालू. म्हणजे त्याचे महत्त्व समजेल.बारा वर्षांतील कामगिरी...७००० पेक्षा अधिक वृक्षारोपण व संगोपन.पत्नीच्या मदतीने खोदलेले ७० चर खोदून दरवर्षी चार कोटी लिटर पाणी साठवून मुरवण्याची किमया साधली.पुनरुज्जीवन केलेल्या ५२ बारवा.डोंगरदऱ्यात( किल्ल्याव्यतिरिक्त ) शोधून काढलेल्या शिवकालीन टाक्या… २३पुष्करिणी… ४जंगलपट्ट्यात केलेले श्रमदानातून केलेले पाणवठे…२७सपाट मैदानात श्रमदानातून तयार केलेले पाणवठे …१२दरवर्षी स्वतः गवत कापून ३५ फूट रुंदीचे जाळपट्टे तयार करणे.. त्याची लांबी १६ कि.मी.परिसरात शोधलेली खडकावरची कातळशिल्पे… ७जुन्नर, आंबेगाव परिसरातील निसर्ग व पर्यावरण संबंधी वैशिष्ट्यपूर्ण व समाज माध्यमांवर प्रसारित छायाचित्रांची संख्या… अडीच लाखफेसबुकवर पर्यावरणावर लिहिलेले छोटे लेख… ४५००पर्यावरण प्रबोधन… ४०० शाळांत सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी.बीजसंकलन…लाखो बियांचेरमेश खरनाळे यांनी २०१२ मध्ये सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर आपले मूळ गाव खोडद गाठले. देश सेवेच्या ध्यासाने झपाटलेल्या रमेश यांनी जुन्नरमध्ये गरीब व आदिवासी मुलांना सैनिक आणि पोलीस भरतीसाठी मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र सुरू केले. दिवसातले १४ ते १५ तास त्या मुलांसोबत राहत वर्गात आणि क्रीडांगणावर प्रशिक्षण दिले. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या ६५ मुलांना पोलीस भरतीमध्ये नोकऱ्या मिळाल्या. नोकरी मिळाल्यानंतर सरांना भेटण्यासाठी एकही मुलगा आला नाही. .Human Wildlife Conflict: समतोलातून टाळता येईल संघर्ष.एका क्षणी आपण हे काम का करतोय? असा प्रश्न त्यांना पडला. त्यातून उद्विग्नता येऊन त्यांनी प्रशिक्षण देणे बंद केले. त्याच काळात त्यांनी स्वतः वनखात्याची परीक्षा दिली. त्यातून स्वतःच वनखात्यात दाखल झाले, ते पर्यावरण सेवा हेच ध्येय ठेवून.माणसांसाठी कितीही केले तर ते जाण ठेवतीलच असे नाही. पण आपल्या कामातून निसर्ग नक्कीच फुलत राहील आणि फुलणारा निसर्गच आपल्याला सर्वोच्च आनंद देऊ शकेल, हा त्यांचा विश्वास आणि प्रेरणा आजही कायम आहे..वनखात्यामध्ये कामाची सुरुवात...वनखात्याच्या प्रशिक्षणात निसर्गातील वृक्षाबरोबरच पशू पक्ष्यांचेही महत्त्व समजावून सांगण्यात आले होते. नोकरीच्या पहिल्या काही आठवड्यातच त्यांच्या लक्षात आले की जुन्नर भागातील काही लोक -लहान मुले आणि तरुणही पशुपक्ष्यांची चोरून, लपून शिकार करतात. रमेश यांनी पहिल्या टप्प्यात त्यावरच काम करायचे ठरवले. त्यांनी सुरुवात केली शाळेतल्या मुलांना भेटण्यापासून. त्यातही विशेषतः अशा ठिकाणच्या वनविभागाच्या जवळच्या दुर्गम भागातील शाळांची निवड केली. त्यांना लहानपणी चांगले संस्कार दिले तर ते नक्कीच शिकार करणार नाही, हा आशावाद ठेऊन. मुलांशी संवाद साधतानाच त्यांनी नेमबाजीची एक स्पर्धा आयोजित केली. परिसरातील अनेक शाळांमधील व शाळेबाहेरीलही मुले यात सहभागी झाली. ते सर्व गलोलने दगड मारून पक्ष्यांचा वेध घेत असत..ही सर्व मुले स्पर्धेला आल्यावर खरमाळेंनी त्यांची स्पर्धा घेतलीच नाही. त्या उलट प्रत्येकाकडून पैसे देऊन सर्व गलोल विकत घेतल्या. याच वेळी या मुलांना पशुपक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व खूप प्रभावी शब्दात पटवून सांगितले. आजपासूनच पशुपक्ष्याची शिकार करणार नाही, अशी त्या मुलांकडून तिथेच संकल्प करून घेतला. हीच बाब त्यांना आपल्या आईवडिलांशी बोलायला सांगितली. निरागस मुलांवर हे संस्कार कायम राहतात. या मुलांनी खरोखरच घरी जाऊन आपल्या आई-वडिलांच्या मनावरही शिकार करायची नाही, हेच बिंबवले. त्यात मोठे यश आले. कारण खरोखरच पुढच्या काळात पक्षी आणि छोट्या प्राण्यांच्या शिकारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे लक्षात आले..Human Wildlife Conflict: समतोलातून टाळता येईल संघर्ष.झाडे जगविण्याचे ध्येय...२०१९ मध्ये रमेश यांनी दुसरे ध्येय ठेवले. वनविभागाने लावलेली झाडे जगविण्याचे... त्यांची मर शून्यावर नेण्याचे. जुन्नर तालुक्यातल्या फांगुळगव्हाण गाव शिवारात आपल्या पत्नीसह वरचेवर जात, आवश्यक तिथे श्रमदान करत त्यांनी वनविभागामार्फत लावलेली ५ हजार झाडे यशस्वीपणे जगवली. त्या वेळी आजूबाजूने जाणारे लोक म्हणत, ‘‘ही झाडे जगत नाहीत. या आधी कितीतरी वेळा लावली आणि मेली. तुम्हा एवढे राबून काय उपयोग?’’ पण त्यांच्या कुणाच्या बोलण्याने हताश न होता आपली धडपड सुरू ठेवली. आहे ती झाडे जगवण्याचे काम केलेच, पण स्वतः आणखी १०० झाडे अधिकची लावली. पुढे काही वर्षानंतर त्याच परिसरात हजारो बियांचे रोपणही केले. त्यातून आज तिथे मोठ्या संख्येने वृक्ष तयार झाले आहेत..पाणवठ्यांना जिवंत करण्यासाठी धडपडप्राणी जगले पाहिजेत, तर त्यांच्यासाठी आणखी काय काय लागते, यावर त्यांचा विचार सुरू झाला. पुढे काही दिवसातच वन खात्याने वनक्षेत्रात जलसंधारणासाठी गॅबियन बंधारे आणि काँक्रीट बंधारे बांधले. त्यावेळी त्यांना उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता करणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्टपणे समजले. कारण उन्हाळ्यात जंगल भागातील पाणी एप्रिलमध्येच संपते. पाण्यासाठी लहान मोठ्या प्राणी पक्ष्यांची धावपळ सुरू होते. पाण्याच्या आशेने ते चक्क गाव परिसरातही शिरतात. त्याचा लोकांना खूप त्रास होतो. काही भागात उन्हाळ्यात वाळलेल्या गवतांना आगी लावण्याचे प्रकारही जाणून बुजून घडतात. .कारण काही लोकांचा समज असा आहे की जळलेल्या भागात गवत चांगले येते. पण त्यातून होते काय, तर प्राण्यांसाठी प्यायला पाणी नाही, खायला गवत नाही, अशी स्थिती उद्भवते. मग जुन्नर तालुक्यातील काही परिसरात अडीचशे ते तीनशे सांबरांचा कळप पाणी पिण्यासाठी डोंगर व जंगल उतरून गावात येतो. ते टाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. या समस्येवर उपाय म्हणून नैसर्गिक पाणवठ्यांचा शोध सुरू केला. विशेषतः जंगलातील जनावरे पाणी प्यायला जातात, त्या भागातील विविध नैसर्गिक जलस्रोत शोधले. .अशा झऱ्यांजवळच पाणी अडवून छोटेखानी पाणवठे तयार केले. तिथेच या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. पावसाळ्याव्यतिरिक्त सलग पाच वर्ष हे झरे शोधण्याचे आणि त्या जागी छोटे मोठे पाणवठे तयार करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू होते. बरे, पुन्हा हे शिकारी लोकांना कळता कामा नये, कारण अशा पाणवठ्यावर ते दबा धरून शिकार करू शकतात. मग पाणवठे कसे करायचे? त्यांना आपल्यासोबत पत्नीलाही न्यायला सुरू केले. चक्क दोघांनी मिळून कुदळ फावड्यांनी श्रमदानातून अनेक पाणवठे केले. पुन्हा त्याची कुठेही चर्चा करायची नाही, की प्रसिद्धी करायची नाही, हे तत्त्व ठेवले.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.