Ajit Pawar Tribute : नाशिक जिल्ह्याच्या सहकार, कृषी व शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ राहिलेले नेतृत्व अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शुक्रवार (ता. ३०) रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या धडाडीच्या निर्णयांच्या व कामकाजाची आठवणींनी उपस्थितांना गहिवर आला होता..रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या या शोकसभेत दिवंगत पवार यांच्या आठवणी जागवण्यात आल्या. जिल्हा बँकेला कठीण काळात दिलेला आधार आणि कांदा उत्पादकांसाठी थेट दिल्ली दरबार पाठपुरावा,शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदराने पतपुरवठा अशा उपस्थितांनी भरभरून आठवणी सांगितल्या. सहकार क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना माजी खासदार देविदास पिंगळे यांनी सांगितले. .Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त.ज्यावेळी जिल्हा बँक आर्थिक अडचणींच्या भोवऱ्यात सापडली होती, तेव्हा बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ८०० कोटींची राज्य सरकारकडून मदत केल्याने जिल्हा बँकेचा रिझर्व बॅंकेकडून रद्द होत असलेला परवाना वाचला. तर नाशिकमधील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेला कमी व्याजदराने पतपुरवठा मिळण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन पाठपुरावा केला व त्यास यश आल्याचे विष्णुपंत म्हैसधुणे यांनी सांगितले..Ajit Pawar Meeting : 'एआय'चा कृषी आणि सहकार विभागाने वापर करावा; उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजितदादांची तळमळ किती सच्ची होती, मविप्रचे सभापती व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी कांदा प्रश्नावर त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची आठवण सांगितली. मविप्र संस्थेशी असलेली त्यांची नाळ शेवटच्या श्वासापर्यंत तुटली नाही, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. .‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, माजी सरचिटणीस नीलिमा पवार, माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, अरविंद कारे, माजी संचालक सचिन पिंगळे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी खासदार देविदास पिंगळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयंत जाधव, वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, हरीश आडके, माजी प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, रश्मी हिरे, गौतम सुराणा यांनी भावना व्यक्त केल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.