Rural Story: पुण्याच्या हवेली व राजगड तालुक्यांतील डोंगरी भागातून सिंहगडाची एक उपरांग पश्चिमेला खानापूरकडे सरकते. याच पर्वतरांगेत मणेरवाडीच्या जंगलाला अगदी खेटून एक जोडपं गेल्या दीड दशकापासून सुखी संसार करते आहे. मात्र हे घर स्वतःची नव्हे; तर जगाची काळजी घेण्यात व्यस्त असते. या घरातील तानाजी तुकाराम भोसले (४२) व सौ. स्वाती तानाजी भोसले (३५) हे शेतकरी जोडपं म्हणजे दऱ्याखोऱ्यांतील संकटग्रस्त माणसं, जखमी पशुपक्ष्यांसाठी देवदूताच काम करतंय. .चौथीतील चिमुकला तानाजी सिंहगडावर जाई व अवघड चोरवाटेने गडावरची शिवज्योत गावात आणत असे. पुढे सातवीत तानाजीला पशुपक्षी, झाडे हेच सर्वस्व वाटू लागले. त्याने जंगलात पाणवठेही उघडले. विशीतल्या तानाजीने तर थेट लाकूडतोडे, शिकाऱ्यांविरोधात दंड थोपटले. जंगलात एकाने बिबट्या मारल्याचे कळताच दुःखी तानाजीने वन विभागासह छापा मारीत गुन्हा दाखल केला..Inspiring Farmer Story: जीवनात ही घडी अशीच राहू दे.त्याने अजगर, रानडुकरे, सांबर, भेकर, ससे, चितळ, साळिंदराच्या शिकारी रोखल्या. निसर्गात रमलेला तानाजी शिकला नाही. तो शेती करू लागला. पुढे कर्ज काढून त्याने दोन मालवाहू गाड्या घेतल्या. हिंमतवान शेतकरीपुत्र तानाजीची कीर्ती नात्यागोत्यांत पसरत गेली. त्यातून करंजावणे गावचे शेतकरी दत्ता महाडिकांची मुलगी स्वातीचं स्थळ तानाजीसाठी चालून आलं. त्यांचे थाटात लग्न लागले..स्वातीने दिले प्रोत्साहनलग्नानंतर तानाजीच्या मूळ निसर्गप्रेमाला स्वातीने प्रोत्साहन दिले. आता पशुपक्ष्यांना पाणी देण्यासाठी स्वातीदेखील जंगलात जाऊ लागली. संकटातील प्राण्याची ती काळजी घेई. जखमी हरिण, मोर, सशापासून ते अजगरावर ती प्रथमोपचार करे आणि त्यांना अन्नपाणी देत असे. हे जखमी प्राणी काही तासांत पुढे वन खाते किंवा पशूबचाव प्रतिनिधींच्या हवाली केले जात. जखमी पशुपक्ष्यांची काळजी घेणाऱ्या या दांपत्याला एकदा सिंहगडावरून एक पर्यटक दरीत कोसळल्याचे कळले..Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य.तानाजी तिकडे धावला. मात्र पर्यटक वाचू शकला नाही. ही घटना तानाजी व स्वातीने जिवाला लावून घेतली. दऱ्याखोऱ्यांत माणूस संकटात सापडल्यास त्याच्या मदतीसाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरतो व वेळीच मदत न पोहोचल्यास त्याचा बळी जातो, हे या जोडीच्या ध्यानात आले. त्यामुळे यापुढे मानवी ‘रेस्क्यू’साठी मागे हटू नका, असे स्वातीने तानाजीला सुचविले. यामुळे कोणताही अपघात होताच तेथील जिवासाठी तानाजी धावू लागला. या दांपत्याने आपत्ती व्यवस्थापन कामात झोकून दिले..रस्ते अपघात, सर्पदंश, नदी-धरणातील बुडीत घटना, दऱ्याखोऱ्यांतील पडण्याच्या दुर्घटना, गडकोटांवरील अपघात, जंगलात पर्यटक हरविणे किंवा वन्यजीव संरक्षण अशा कोणत्याही बचाव कामात तानाजी रात्रीअपरात्री हजर असतो. अशावेळी स्वाती धीटपणे साऱ्या घराचा आधार बनते..तानाजीने आतापर्यंत २८०० सापांना वाचविले. ४५ हरिण-भेकरे, २०० ससे-साळिंदर-मुंगुस, ४०० पक्षी वाचविले. गोरखगडाच्या दरीत एकदा सात जणांचं कुटुंब अडकून पडले होते. तानाजीने साऱ्या कुटुंबाला वाचवलं. त्याने चंद्रभागेतून चार जणांना, तसेच हवेली व वेल्हा भागातील घटनांमध्येही चौघांना वाचविले. विविध ५० घटनांमध्ये त्याने बुडालेले मृतदेह काढून पोलिसांच्या हवाली केलेत..मुलेही मातापित्याच्या वाटेनेवन, पोलिस, महसूल अधिकाऱ्यांमध्ये तानाजी कार्य चर्चेचा विषय बनले. पोलिस खात्याने त्याला ‘विशेष पोलिस अधिकारी’ तर; आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्याला ‘आपदा मित्र’ घोषित केले आहे. या वाटचालीत तानाजीला सच्ची साथ मिळते ती स्वातीची. विशेष म्हणजे या जोडीची दोन्ही अपत्येसुद्धा आता बचाव कार्यात दिसतात. आठवीत शिकणारा वैभव बापासोबत पुराच्या पाण्यात उतरतो; आणि पाचवीतील वैष्णवी आईसोबत सापाची काळजी घेताना दिसते. तानाजी आणि स्वातीने आपल्याच शेतीत ‘आपत्ती बचाव प्रशिक्षण केंद्र’ उभारण्याचं स्वप्नं पाहिले आहे..‘‘देवळात जाण्यापेक्षा संकटग्रस्त माणसाकडे, जखमी पशुपक्ष्यांच्या मदतीला धावून जाणं: त्यांना जीवदान देणं हे काम आम्हाला सर्व पुण्यकर्मांहून श्रेष्ठ वाटते,’’ असे हे दांपत्य म्हणते. दुर्गम भागात शेतकऱ्याला सर्पदंश होताच तानाजी वाऱ्यासारखा धावून जातो. तो स्वखर्चाने दवाखान्यात नेत शेतकऱ्याचे प्राण वाचवतो. तानाजी म्हणतो, ‘‘मला हे कळतं, की प्रत्येक बचाव कार्यात माझा जीव खूप धोक्यात असतो. पण सिंहगडावर धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे आमचे आदर्श आहेत. त्यांनी जिवाचा विचार केला नव्हता. मग या तानाजी भोसलेने आज लोकांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा का करावी?’’- तानाजी भोसले ९७६३९०८५०१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.