Jalna News : संकटं नाहीत असं नाही. पण हार मानून कसं चालंल. संकटाला तोंड द्यावंच लागल. नाय तर शेतीत उतरलेली नवी पिढी हातपाय गाळून बसंल. दोन वर्षांत द्राक्षाचे क्षेत्र तीन एकरानं कमी केलं होतं. आता ते पुन्हा वाढवून पूर्ववत करतोय नव्या उमेदीने आणि नव्या आशेनं. सुख आणि संकट तर ऊन सावलीचा खेळ! हे शब्द आहेत, जालना जिल्ह्यातील कडवंची येथील माजी सरपंच व तब्बल ४५ वर्षांपासून शेतीशी नाळ जुळलेले द्राक्ष उत्पादक चंद्रकांत क्षीरसागर यांचे..ते म्हणाले, ‘‘पाणी नव्हतं तो काळ आणि आता पाणी आहे तो, असे दोन्ही काळ आम्ही अनुभवतोय. सुमारे ४५ वर्षांपासून शेती करतोय. या शेतीने अन् शेतीतल्या द्राक्ष पिकानं आम्हाला उभं केलं. १९८५-८६ मध्ये जेव्हा पहिल्यांदा एक एकर हलक्या जमिनीत द्राक्ष लावली ती गेली. तेव्हा पाण्याचा प्रश्न होता. त्यानंतर १९८९ मध्ये ३० गुंठ्यांवरच द्राक्ष केली. ती सतत ९ वर्षे कधी दुष्काळानं तर कधी अति पावसामुळं जायची. ती द्राक्ष शेती फारशी फायद्याची राहिली नाही, पण म्हणून खचलो नाही. .Grapes Farm: पावसानंतर द्राक्षाच्या बागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता.हे पीक आपल्याला नक्की साथ देईन असं मनात वाटायचं. त्यामुळे या पिकात सातत्य ठेवत गेलो. २००० मध्ये खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्यानं गाव शिवारात पाणलोट्याचं काम झालं आणि पाण्याची उपलब्धता झाली. पुढे शेततळी आली अन् पाण्याची शाश्वती वाढत गेली. २००१ पासून दरवर्षी एक ते दीड एकर द्राक्ष वाढवत नेली. .जवळपास १२ एकरांपर्यंत अलीकडच्या काळापर्यंत द्राक्ष शेती विस्तारली होती. पुन्हा कोरोनाच्या काळ आला अन् त्यानंतर दोन-तीन वर्षे द्राक्ष शेतीवर संकटाचे ढग वाढत गेले. त्यामुळे सुमारे तीन एकर द्राक्ष शेती कमी केली. यंदा पुन्हा एकदा पाण्याची शाश्वती वाटू लागल्याने व अनेक ठिकाणी द्राक्ष क्षेत्र कमी झाल्याने तीन एकर द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी रोप तयार केली. येत्या जानेवारीत त्याची लागवड नक्की करणार.’’.द्राक्ष पीक आमच्यासाठी कल्पतरूच‘‘जीवनात सुख आणि दुःख सुरूच असतं. पण आमच्या मनातील स्वप्नं शेती अन् द्राक्ष पिकानेच पूर्ण केली. भुसार मालाच्या शेतीने जिथे घराला प्लॅस्टर करणे शक्य नव्हतं तिथे द्राक्ष पिकानं पक्की घरं, मुलांचं शिक्षण, आरोग्याचा खर्च तसेच आमच्या शिवारात शेकडो लोकांच्या हातांना काम देण्याचं बळ निर्माण केलं. त्यामुळे द्राक्ष पीक माझ्यासाठी व आमच्या शिवारात शेतकऱ्यांसाठी कल्पतरूच म्हणता येईल,’’ असे श्री. क्षीरसागर म्हणाले..Grape Farming: कडवंचीचे द्राक्ष आगार ‘जर-तर’च्या फेऱ्यात.यंदाचा अनुभव अजबचश्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘गत दोन वर्षांत पाणी नव्हते तरी कशीबशी जगवलेली मोसंबी बाग, जूनमध्ये पाणी येईल तोवर शेततळ्यातील पाण्यावर द्राक्ष आणि मोसंबी जगवणे शक्य होणार नाही म्हणून सोडून दिली. त्याच वेळी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी तीन विहिरी खोदल्या. पावसाच्या धाकाने एप्रिलमध्येच त्या पूर्ण केल्या. मोसंबी सोडून द्राक्ष बाग जगवली तर तिकडे निसर्गानं लीला दाखवली. .जूनमध्ये येणारा पाऊस १२ मे पासूनच सुरू झाला. मोसंबी बाग जळाली आणि खोदलेल्या विहिरी तुडुंब झाल्या. एक पीक केलं आणि दुसरं घेण्याची आशा पाण्याच्या उपलब्धतेमुळे निर्माण झाली. त्यामुळे द्राक्ष लागवडीकडे नवीन कोणी धजावत नसले तरी आम्ही अनेक वर्षांपासून द्राक्ष शेती करणारे काही शेतकरी आमच्या शिवारातील द्राक्ष क्षेत्र विस्तारतो आहोत. मी तर द्राक्षाबरोबरच डाळिंब लावण्याची तयारी करतोय. एवढेच म्हणायचं चारी दिवस सारखे नसतात. संकटावर मात केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.