Akola News : जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जात असला तरी आता या जिल्ह्यात सकारात्मक बदलाची नांदी होताना दिसू लागली आहे. परंपरागत कापूस, सोयाबीन, ज्वारी यांसारख्या पिकांबरोबरच शेतकरी आता फळबाग लागवडीकडेही मोठ्या प्रमाणावर वळताना दिसतो आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील पीक पद्धतीत सकारात्मक बदल घडत असून शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीबरोबरच आर्थिक बळकटीकडे पाऊल पडू लागले आहे..जिल्ह्यात केळी, पपई, संत्रा, सीताफळ, आंबा यांसारख्या हंगामी व दीर्घकालीन फळपिकांची लागवड वाढते आहे. विशेष म्हणजे अकोल्यातून आता केळीची निर्यात होत आहे. या मोसमात केळीच्या आतापर्यंत १० ते १२ टन क्षमतेच्या सुमारे १५० गाड्या इराण, इराक, दुबईच्या बाजारपेठांमध्ये पोचल्या आहेत. आजवरची ही सर्वाधिक निर्यात मानली जात आहे. .Raigad Fruit Farming : तीन हजार हेक्टरवर फळ लागवड.अद्याप केळी निर्यातीचे काम सुरू असून हा आकडा वाढणार आहे. निर्यातदाराच्या माध्यमातून स्थानिक शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. र, युवा केळी उत्पादक, पिंप्री खुर्द, जि. अकोला.बाजारपेठ, दर आणि इतर पिकांच्या तुलनेत दोन पैसे अधिक मिळत असल्याने केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच या वर्षी जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर केळीची लागवड झाल्याचा अंदाज उद्यानपंडीत पुरस्कारप्राप्त केळी उत्पादक तथा केळी उत्पादक शेतकरी महासंघाचे राज्य सरचिटणीस सचिन कोरडे यांनी सांगितले..Passion Fruit Farming: नाशिकमध्ये फुलवली ‘पॅशन फ्रूट’ची बाग.शासनाचे पाठबळजिल्ह्यात शासनाच्या कृषी विभागाचेही प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे म्हणाले, की जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत या वर्षी १२०० हेक्टर फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. आतापर्यंत ९०० हेक्टरला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून दोनशे हेक्टरवर प्रत्यक्ष लागवडही झाली आहे. .मागील वर्षी या योजनेतून तब्बल ९०० हेक्टरवर लागवड झाली होती. त्याचबरोबर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गतही मागील वर्षी ७०० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती. म्हणजेच, केवळ पारंपरिक शेतीतच नाही तर योजनांच्या माध्यमातून फळबागांची व्याप्ती सातत्याने वाढत आहे..माझी तीन एकरांत लागवड होती. या बागेतून ४२ टन माल निघाला. त्याची निर्यात झाली. अजूनही कटन होणार आहे. आजवरच्या मालाला १४०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. स्थानिक दरापेक्षा हा दर निश्चितच चांगला आहे. यावर्षीही केळीच्या सात हजार रोपांची लागवड केली आहे.- स्वप्नील रावणका.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.