Nashik News: के. के. वाघ शिक्षण संस्था, के. के. वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन तसेच स्माइल व स्पिनॅच यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बाळासाहेब देवराम वाघ यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता. ८) के. के. वाघ शैक्षणिक संकुल, भाऊसाहेबनगर (ता. निफाड) येथे मोफत आरोग्य तपासणी महाशिबिर उत्साहात पार पडले..सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या या शिबिरात २,६९५ ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले..Rural Health Camp: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आरोग्य शिबिर .भाऊसाहेबनगर, पिंपरी, रौळस, कुंदेवाडी, कारसुळ, वडाळी (नजीक), शिरसगाव, कोकणगाव, ओणे, कसबे-सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपळस (रामाचे) आणि कोठुरे या गावांतील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला..उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, विश्वस्त शकुंतला वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, प्राचार्य पी. टी. कडवे, डॉ. बी. व्ही. कर्डिले, तानाजी पुरकर, बाळासाहेब जाधव, विष्णूपंत मत्सागर, सातभाई साहेब, पुंडलिक ताजणे, विलास बोरस्ते, डॉ. राहुल घायाळ, डॉ. शरद आहेर तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.